logo

नविन नांदेड, जलसंस्कृतीचे जनक, श्रध्देय भारताचे माजी गृहमंत्री कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त वडगांव (वाजेगांव) समाधी स्थळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकरावजी चव्हाण, आ.सौ.अमिताभाभी चव्हाण यांच्यासह चव्हाण कुटूंबीय परिवार, पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिवादन केले. 

दि.14 जुलै रोजी कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त वडगांव(वाजेगांव) येथे सकाळी 09 च्या सुमारास समाधी स्थळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकरावजी चव्हाण, आ.सौ.अमिताभाभी चव्हाण व चव्हाण कुटूंबिय परिवारांच्या वतीने विधीवत पुजा करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजुरकर, आ.वसंतराव चव्हाण, जि.प.अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर, नांवाशमनपाच्या महापौर सौ.शैलजा स्वामी, माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, श्याम दरक, काँगेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, भाऊराव चव्हाण कारखान्याचे गणपतराव तिडके, मनपाच्या स्थायी सभापती सौ.मंगला गजानन देशमुख, माजी सभापती विनय पाटील गिरडे, उपसभापती डॉ.प्रा.ललीता शिंदे, नगरसेविका करुणा जमदाडे, जि.प.सदस्य गंगाप्रसाद काकडे, मनोहर पाटील शिंदे, माजी जि.प.सदस्य आनंद गुंडले, बाबा शेठ, जि.प.च्या समाज कल्याण सभापती सौ.निखाते, डॉ.निखाते, माजी सभापती बेळगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, नळगे, कल्याण सावकार सुर्यवंशी, विरेंद्रसिंघ गाडीवाले, गजानन देशमुख, साईनाथ जाधव, गंगाधर वडणे, दलीतमित्र नारायण कोलंबीकर, माधव आंबटवाड, दत्तात्रय कुलकर्णी, उपसरपंच पिंटू पाटील, भगवान कदम, नानासाहेब जाधव, डॉ.कालीदास मोरे, माजी पं.स.सदस्य मोरे, सौ.मंगला निमकर, भारतीबाई पवार, सौ.धुळेकर, सौ.पुष्पा शर्मा, कविता कळसकर, सिमा देशमुख, इंगोले, श्रीमती सुरेखा नेरलकर, व्यंकट मोकळे, संतोष पांडागळे, सतिश देशमुख, संभाजी भिलवंडे, दिलीप पाटील, शेषेराव चव्हाण, पंढरीनाथ केंद्रे, माजी नगराध्यक्ष शेट्टे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, राजु लांडगे, मारोती सांगवीकर, रवि बुंगई, डॉ.नरेश रायेवार, डॉ.रमेश नांदेडकर, जे.ई.गुपीले, नांदेड महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे रमेश ठाकूर, किरन देशमुख, सारंग नेरलकर यांच्यासह जि.प.सदस्य व नांवाशमनपाचे लोकप्रतिनिधी, काँग्रेस आय चे पदाधिकारी, ग्रामस्थ, नागरिक व पत्रकार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हाधिकारी डोंगरे, उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, व प्रशासनाच्या वतीने समाधी स्थळी आदरांजली वाहण्यात आली. जयंती निमित्त समाधी स्थळी नांदेड शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातून विविध भागातून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त जि.प.सदस्य काकडे यांच्याकडून शालेय साहित्य वाटप
कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त कै.नरहर कुरुंदकर हायस्कुल कौठा येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे तर तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम संयोजक तथा जि.प.सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्यावतीने करण्यात आला. 

जयंतीचे औचित्य साधून कै.नरहर कुरुंदकर हायस्कुल कौठा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक भालेराव मॅडम व गणेश काकडे, माजी पं.स.सदस्य सुनिल पवार, अतुल बनसोडे, मारोती सांगवीकर, संभाजी घोगरे यांच्यासह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती. तर तुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. सिडको येथे कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजक डॉ.अशोक कलंत्री यांच्यावतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्रा.शाळा हडको येथे खाऊचे वाटप तर राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हडको येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संयोजक डॉ.अशोक कलंत्री यांनी केला असून त्यांनी जयंती निमित्त विविध विधायक कार्याने जयंती साजरी करतात. यावेळी शाळेतील शिक्षकांसह काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    Tags