logo

नांदेड (एनएनएल) ज्या चव्हाण कुटूबियांना राज्याच्या नसून देशाच्या राजकारणापर्यंत सहकार्य करणाऱ्या नेत्यांनाच चव्हाण कुटूबियांनीच हुतेपुरस्पर बाजूला ठेवण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात अनेक नेते असताना कोकणातून येणाऱ्या डी.पी. सावंतांना मोठे करण्याचे काम अशोकरावांनी केेले, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. स्थानिक नेतृत्व निर्माण होऊ देण्याची संधी अशोकरावांनी कधीही दिली नाही, असे प्रकट मत माजी खा. भास्कराव पा. खतगावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

स्व. शंकरराव चव्हाण यांना मोठे करण्याचे काम स्व. साहेबराव बारडकर, स्व. पद्मश्री श्यामराव कदम, स्व. बाबासाहेब गोरठेकर यांच्यासह आदींनी स्व. शंकरराव चव्हाण देशपातळीवरचे नेतृत्व करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. स्व. साहेबराव देशमुख यांना मंत्री पदाचे स्वप्न कधी पूर्ण होऊ दिले नाही, याचबरोबर खा. अशोकराव चव्हाणा पुढच्या पिढीतील नेतृत्व संपविण्याचे काम त्यांनी केले आहे. आ. अमर राजूरकर, आ. अमिता चव्हाण यांनी कोकणातून येणाऱ्या आ. डी.पी. सावंतांना मोठे केले. सावंत यांना नांदेडाचे काही माहित नसताना व याठिकाणच्या जनतेशी नाळ कधीही जुळली न ाही अशांना नेतृत्व करण्याची संधी दिली. ऐवढेच नसून नांदेडकरांच्या डोक्यावर बसविण्याचे पाप चव्हाण कुटूूबियांना केले आहे, अन्‌ तेच म्हणतात स्थानिक नेतृत्व सक्षम नाही. शहरात 8 दिवसाला बॅनर लागतात, बॅनर लावण्यासाठी कॉंग्रेस मंडळींनी पैसा आणला कुठून याचा हिशोब आता जनताच विचारणार आहे. खा. अशोकराव चव्हाण अजूनही दिव्य स्वप्न पाहत आहेत, राज्याच्या विधानसभेत भाजपाचे 124 आमदार असून तेव्हा देखील कॉंग्रेसला भाजपकडे नेतृत्व नाही असेच वाटत होते. अशोकराव चव्हाण यांनी शेजारच्या लातूर जिल्ह्याचा धडा घ्यावा असा सल्ला खतगावकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील तरूण मतदारांना अशोकरावांच्या विकासाचा अझेंडा समजला आहे, या ठिकाणचे मतदार जागरूक आहेत, गुरू-ता-गद्दी च्या नावाखाली खा. चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली, केवळ पैशाच्या जोरदार निवडणुका लढविणे व जिंकणे तसेच निवडणुका जिंकण्यासाठी विकास कामांचा निधी वापरणे पण महापालिकेच्या निवडणुकी खा. अशोकराव चव्हाण जनता तुम्हाला जबाब विचारणार आहे. खा. अशोकराव चव्हाणपासून भास्कराव पा. खतगावकर, माजीमंत्री गंगाधर कुटूंरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, आ. प्रताप पाटील यांच्यासह आदी मंडळीनी शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व राज्यपातळीवर, देशपातळीवर नेण्यासाठी सहकार्य केले तेच आज तुमच्यापासून दूर का गेले आहेत याचे आत्मचिंतन खा. चव्हाण यांनी करावे असा टोला माजी खा. भास्करराव पा. खतगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून लगावला आहे.

    Tags