logo

BREAKING NEWS

सिडकोतील मध्यवर्ती उद्यानाचे कर्मचार्‍याअभावी दुरअवस्था

अनेक वृक्ष पाण्याअभावी जळाली तर साहित्यांची सुरक्षा एैरनिवर

नवीन नांदेड, नावामनपाच्या सिडकोतील मध्यवर्ती उद्यान असलेल्या गुरुवार बाजारातील उद्यानाची कर्मचार्‍याअभावी दुरअवस्था झाली असून अनेक वृक्ष पाण्याअभावी जळाली तर साहित्य व विद्युत खांबाची सुरक्षा रामभरोसे झाली असून प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी कर्मचारी नेमूण उद्यानाची देखभाल करण्याची मागणी नागरीकांत होत आहे. 

सिडकोच्या गुरुवार बाजार परिसरात मनपा प्रशासनाच्या वतीने मध्यवर्ती उद्यानाची निर्मीती करण्यात आली. याठिकाणी खेळण्याच्या साहित्यासह पाण्याचे कारंजे, विविध प्रकारांच्या वृक्षांची लागवड व जेष्ठ नागरीकांसह बाल गोपाळांसाठी मनोरंजन असलेले हे उद्यान ऐकेकाळी चांगल्या प्रकारचे होते. याठिकाणी गेल्या चार पाच महिन्यापूर्वी दोन ते तीन कर्मचारी कार्यरत होते. परंतू अचानक या कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून या उद्यानात कोणीही कर्मचारी नसल्यामुळे पाणी असून देखील कर्मचार्‍याअभावी अनेक वृक्ष वाळून गेली आहेत. तर अनेक ठिकाणंच्या वस्तुंचेही कर्मचार्‍याअभावी देखभाल होत नसल्याने अनेकांनी खेळणीसाहित्यांचीही नासधुस केली आहे. उद्यानाला असलेली सुरक्षा भिंत पाठीमागील बाजुस पडली असल्याने अनेक जणावरांचा मुक्त वावर सुरु झाला असून उद्यानातील अनेक वृक्षांसह गवतही या जणावरांच्या वावरामुळे उध्दस्त झाले आहे याप्रकरणी उद्यान अधिक्षक यांच्याशी संपर्क साधला असता सुरक्षा भिंतीबाबत सार्वजनिक विभागाशी संपर्क साधूनही त्या विभागाने सुरक्षा भिंतीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट तीन ते चार लेखी पत्र दिले असल्याचेही सांगीतले. लवकरच या उद्यानात कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगीतले. मात्र नागरीकांना एैन उन्हाळ्यात नागरीकांना थंड हवेचे व लहान मुलांना खेळण्याचे असलेले उद्यान हे दुरअवस्थेत झाल्याने जेष्ठ नागरीकांसह लहान मुलांची प्रचंड गैरसोय झाली असून, तात्काळ मनपा प्रशासनाने कर्मचार्‍यांची नियुक्ती करुन सुरक्षा भिंत त्वरीत बांधण्याची मागणी होत आहे.  

    Tags