logo

नांदेड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे, असेच दिसून येत आहे. कारण शहर स्वच्छतेबरोबरच त्यांनी नदी शुद्धीकरण, रेल्वेस्थानक स्वच्छ अशा विविध योजना योजना त्यांनी सुरू केल्या आहेत. नांदेड रेल्वेस्थानकाचा स्वच्छतेच्या बाबतीत देशात 161 वा नंबर आहे, तर मराठवाड्यात 2 दुसरा नंबर आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी नांदेड येथे आले असताना त्यांनी त्या जाहीर सभेत श्री गोबिंदसिंघजी यांची शपथ घेऊन मी सांगतो की, या देशातील सर्वच गोष्टी शुद्ध करण्याचा विडा मी उचलला आहे. ज्यांनी गुन्हा केला ते गुन्हेगार ठरणार राजकारण, समाजकारण, कोणतेही क्षेत्र असो या सर्व क्षेत्रांची एकदाची शुद्धीकरण करावे लागणार यासाठी मध्यवर्ती निवडणुका घेण्याची वेळ आली तरी चालेल अशी शपथ घेतली होती. या शपथेप्रमाणेच त्यांनी शुद्धीकरणाचे काम सुरू केले असल्याचे दिसून येते. स्वच्छ भारत मिशन या अभियानाअंतर्गत त्यांनी देशातील 400 च्यावर शहरांची निवड करून या शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती केली. याचबरोबर नदी शुद्धीकरणाच्या बाबतीतही त्यांनी कडक पावले उचलले असून गंगा शुद्धीकरणाबरोबरच भिमा नदी शुद्धीकरणाचा आराखडाही त्यांनी तयार केला आहे. हे करत असतानाच देशातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेबाबतचाही सर्वे त्यांनी केला यात नांदेड रेल्वे स्थानकाचा 161 वा नंबर आहे तर औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा 179 वा तर जालना 186 तर मराठवाड्यात लातूर हे सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जात आहे. एकेकाळी नांदेड रेल्वेस्थानक पॅटर्न इतर ठिकाणी राबविण्यासाठी रेल्वे विभागाने पुढाकार घेतला होता. पण हेच रेल्वेस्थानक स्वच्छतेच्या बाबतीत 161 वा असल्याने हा पॅटर्न आता रेल्वेविभाग राबविणार काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

    Tags