logo

नांदेड,  हरिद्वार (उत्तराखंड) येथील खुशवंतघाट परिसरात वर्षोनुवर्षें शीख पंथांचे संस्थापक आणि प्रथमगुरु, श्री गुरु नानक देव जी यांच्या स्मरणात विद्यमान असलेले गुरुद्वारा ज्ञान गोधडी साहेब गुरुद्वाराची त्याच ठिकाणी पुनर्स्थापना (पुनर्निमाण) करण्यात यावे अशी मागणी करत नांदेडच्या हजुरी साधसंगत तर्फे पंतप्रधान मा.श्री नरेन्द्र मोदी आणि उत्तराखंडाचे मुख्यमंत्री मा. श्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांच्या नावे मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पाठविण्या करिता एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मा. अरुण डोंगरे यांना शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता दरम्यान निवेदन प्रस्तुत केले.

प्रस्तुत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उत्तराखंड मधील हरिद्वारच्या खुशवंत घाटांवर शिखांचे प्रथमगुरु, श्री गुरु नानकदेवजी यांनी भेट देऊन कर्मकाण्डापासून दूर राहावे तसेच परमात्माची सच्ची भक्ती करावी असे उपदेश दिले होते. पण जवळपास 30 ते 35 वर्षापुर्वी जेव्हा नदीघाटांचे विकास व विस्तार कार्य सुरु होते तेव्हा वरील गुरुद्वारा तेथून पाडण्यात आला. वरील घाटांवरील अन्य स्थान पाडून त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली मात्र आजपर्यंतही वरील गुरुद्वारा बांधून देण्यात आलेला नाही. वरील स्थानी गुरु नानक देव जी यांनी ऐतहासिक अशा तथ्यांची प्रस्तुती केली होती. संपूर्ण देशातील शीख समाजाने गुरुद्वारा ज्ञान गोधडी साहेबचे पुनर्निमाण करण्यासाठी मागणी प्रस्तुत केलेली आहे. वरील मागणीस नांदेड येथून ही मोठा पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. नांदेड येथे शीख धर्मियांचा महत्वपूर्ण तखत (धर्मपीठ) असल्या कारणांने येथील मागणीस वेगळे महत्व प्राप्त होते. शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन प्रस्तुत करुन ते निवेदन पंतप्रधान मा. नरेन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांच्या पर्यंत पाठविण्याचा आग्रह केला आहे. प्रस्तुत निवेदनावर स. लड्डूसिंघ महाजन, स. इंदरजीतसिंघ संधू, स. अवतारसिंघ पहेरदार, स. जीतसिंघ दुकानदार, रविन्दरसिंघ बुंगाई, सुरजीतसिंघ खालसा, डॉ. भगवंतसिंघ गुलाटी, स. लालसिंघ त्रिकुटवाले, गुरबक्षसिंघ बुंगाई, रामसिंघ चिरागीया, रणबीरसिंघ मठारु, शेरसिंघ तबेलेवाले, संतसिंघ संधू, रतनसिंघ त्रिकुटवाले, टहेलसिंघ शाहू, अर्जनसिंघ मुनीम, तेजपालसिंघ खेड, केहरसिंघ, स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले, गुरुप्रीतसिंघ सोखी, राणा रणबीरसिंघ, प्रेमजीतसिंघ टेलर, महेन्द्रसिंघ लांगरी, नानक कौर, निर्मलकौर, चरणजीतकौर, परमजीतसिंघ भाटिया, हरभजनसिंघ, राजकमलसिंघ जक्रेवाले, इंदरजीतसिंघ चाहेल, गुरमीतसिंघ, इंदरजीतसिंघ दफेदार, इंदरपालसिंघ दुकानदार, जगींदरसिंघ विष्णुपुरीकर, इश्वरसिंघ लोहिया, जयदेवसिंघ हजुरीया, दीपीन्दरसिंघ कराबीन यांच्या सहित शंभर जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

    Tags