logo

नविन नांदेड, नांदेड-लातूर महामार्गावर होणा-या रस्त्याचे चौपदरीकरणामुळे गेल्या महिन्याभरापासून हा मार्ग लातूर फाटा ते सिडको, एमआयडीसी कॉर्नर मार्गे धनेगाव वळविण्यात आल्यामुळे व त्यातल्यात्यात नविन नांदेडातील वाहतूक असा वाहनधारकांचा प्रवाशाचा ताण एकाच रोडवर पडल्यामुळे वाहनधारकांची प्रचंड प्रमाणात कोंडी झाली असून शहर वाहतूक शाखेने नविन नांदेड परिसरात कर्मचा-यांची नियुक्ती करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. 

नांदेड-लातूर-नागपूर हा महामार्गाचे चौपदरीकरण लातूर फाटा ते धनेगाव दरम्यान होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मार्ग गेल्या महिन्याभरापूर्वी बंद करण्यात आला. पर्यायी रस्ता म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (लातूर फाटा) ते संभाजी चौक ते राज कॉर्नर ते रमामाता चौक ते चंदासिंग कॉर्नर ते नांदेड-हैद्राबाद रोडवरुन धनेगाव मार्ग बायपास वळवण्यात आल्यामुळे मोठ्या वाहनधारकांसह बाहेरगावी जाणा-या येणा-या बसेस, मोठमोठी वाहने वरील मार्गावरुन जात आहेत त्यातल्यात्यात सिडको ते लातूर फाटा हा एकेरी मार्ग वाहतूकीसाठी असल्यामुळे व पर्यायी वाहतूक याच मार्गावरुन जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनधारकात कोंडी होत आहे. दैनंदिन अपघाताचे प्रमाणही वाढले असून लातूर फाटा, संभाजी चौक, राज कॉर्नर, रमामाता चौक व एमआयडीसी कॉर्नर येथे शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी किंवा ग्रामीणचे पोलीस नियुक्त केल्यास वाहतूक सुरळीत होईल व वाहनधारकांनाही दिलासा मिळेल. असे वाहनधारकातून बोलल्या जात असून त्वरीत कर्मचा-यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. 

    Tags