सिडको येथे महिलांनी पर्यावरणपूरक होळी केली साजरी

नविन नांदेड(प्रतिनिधी)नांदेड वाघाळा मनपाच्या प्रभाग क्र.39 मधील किसाननगर सिडको परिसरात संयोजक तथा नांदेड नांवामनपाच्या महिला बालकल्याण उपसभापती डॉ.ललीता बोकारे शिंदे यांच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक होळीत परिसर स्वच्छ करुन घरातील टाकाऊ कचरा गोळा करुन होळी मोठ्या उत्साहात साजरी केली.

नांवाशमनपाच्या महिला, बालकल्याण उपसभापती डॉ.ललीता बोकारे शिंदे यांच्या संयोजनाखाली पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. यावेळी होळीचे पावित्र्य अग्नीमध्ये निराश्या, दारिद्र्य, आळस यांचे दहन होऊन सर्वांच्या जीवनात सुख-शांती व आरोग्य येऊ दे या शुभेच्छा उपस्थित महिलांनी सर्व जनांना दिल्या. यावेळी परिसर स्वच्छ करुन घरातील टाकाऊ केरकच-यांची होळी साजरी करण्यात आली. यावेळी सौ.अनुपमा बाहेती, विजया गोडघासे, नैना चक्करवार, कौशल्या कदम, सौ.गट्टेवार, ज्योती नायडू, सितल जाधव, उषा लांडगे, अनुजा वाघ(बोकारे), निता पाटील, पल्ल्वी गोडघासे, गिता बाहेती तसेच परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी होलिका उत्सव आगळ्यावेगळ्या दहनाने साजरा करण्यात आला.

Related Photos