Breaking news

स्वयंसेवकांचा अभिनव उपक्रम नैसर्गिक शिवारफेरीने साजरी केली धुळवड

नांदेड(प्रतिनिधी)धुळवड म्हटले की, धांगडधिंग्याचे पारंपारिक चित्र आपल्या डोळयासमोर येते. पण येथील विस्तारित यशवंतनगरमधील तानाजी प्रभात शाखेच्या स्वयंसेवकांनी मुदखेड येथील प्रयोगशील शेतकरी गिरीशभाऊ जोशी यांच्या शेतात नैसर्गिक शिवारफेरी मारुन धुळवड साजरी केली.

या प्रसंगी गिरीश जोशी यांनी आपल्या शेतातील गाजर, काकडा, केळी, ऊस आदी पिकांबद्दल केलेल्या प्रयोगांची माहिती दिली. रासायनिक शेतीपेक्षाा नैसर्गिक शेती कशी चांगली, याची त्यांनी माहिती दिली. ही शिवार फेरी यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पत्की, हेमंत जांगीड, ऍड. नागराज मांजरमकर, शिवाजी हंगरगे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. अनिरुद्ध लासोनकर,दत्तात्रय पाटील, प्रा. उपेंद्र कुलकर्णी, व्ही. एस. कुलकर्णी,श्रीनिवास जोशी आदींनी सहभाग घेतला हेाता.

Related Photos