छत्रपती शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते- जिल्हाप्रमुख भुजंग पाटील

नविन नांदेड(रमेश ठाकूर)छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी सिडको शहर शिवसेनेच्या वतीने छ.शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले. जयंती निमित्त हडको परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सिडको शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख वैजनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.15 मार्च रोजी शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिडको-हडको परिसरासह मुख्य रस्त्यावर दुतर्फा, भगवे पताके, ध्वज लावण्यात आले होते तर सिडको व हडको येथील छ.शिवाजी महाराज पुतळ्या परिसरात भव्य रोषणाईसह परिसर भगवामय करण्यात आला होता. सकाळी दोन्ही पुतळ्या ठिकाणी अभिषेक करुन अभिवंदन करण्यात आले होते. हडको येथील छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, नगरसेवक अड.संदिप चिखलीकर, शहर प्रमुख पप्पु जाधव, माजी तालूका प्रमुख अशोक मोरे, सुरेश लोट यांच्यासह माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे, राजु गोरे, सिध्दार्थ गायकवाड, मुन्ना डहाळे, पोलीस निरीक्षक संजय निकाळजे, स्वाभिमानी संभाजी बिग्रेडचे माधव देवसरकर, पी.एस.गवळे, उपेंद्र तायडे, भाजपाचे प्रमोद टेहरे, सिडको मंडळ अध्यक्ष विनोद कांचनगिरे, धिरज स्वामी, सिध्दार्थ धुतराज, युवाशक्ती मित्र मंडळाचे संजय घोगरे, सुरेश जोशी, प्रशांत अण्णा बोंढारकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी छ.शिवाजी महाराजांचा ईतिहास 365 दिवसही आचारणात आणल्यासही कमीच पडेल असे मत त्यांनी व्यक्त करुन छ.शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडको शहर प्रमुख वैजनाथ देशमुख यांनी तर सुत्रसंचालन दिगांबर शिंदे, आभार साहेबराव मामीलवाड यांनी केले. यावेळी उपस्थित पाहूण्यांचे हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या अभिवादन करुन भव्य मिरवणूकीला अतिषबाज्याच्या गजरात सुरुवात करण्यात आली. हडको येथून निघालेली भव्य मिरवणूक इंदिरा गांधी शाळा-ज्ञानेश्वरनगर-अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे सिडको येथील छ.शिवाजी चौक येथे संपन्न झाली. मिरवणूकीत सहभागी शिवसैनिकांनी छ.शिवाजी महाराज की जय...., जयभवानी जयशिवाजी अशा घोषणा दिल्या. शिवजयंतीत जितुसिंघ टाक, निवृत्ती जिंकलवाड, कृष्णा पांचाळ, मारोती धुमाळ, संजय काळे, प्रमोद मैड, ब्रिजलाल उगवे, सतिश खैरे, विष्णु कदम, विजयाताई गोडघासे, सरिता बैस, स्मिता कुलकर्णी, पप्पु गायकवाड, राहूल लांडगे, सुरेश जोशी, राजु निखाते, रावसाहेब तारु, पंडीत गजभारे, संतोष आष्टेकर यांच्यासह महिला, युवासैनिक, शिवसैनिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Photos