Breaking news

एन.एम.एम.एम.एस. परीक्षेत राजर्षी शाहूचे नेत्रदीपक यश

नांदेड(प्रतिनिधी)राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एन.एम.एम.एम.एस.) शिष्यवृत्ती परीक्षेत येथील राजर्षी शाहू विद्यालयाच्या 9 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. अनिरूद्ध दत्तात्रय गव्हाणे, निरंजन हरिदास पावडे, कु. रश्मी रमेश भांगे, साईराज रजनीश श्रीमनवार, साईराज वैजनाथ पिंपळपल्ले, योगेश लच्छीराम मुडशे, कु. आकांक्षा आनंद जाधव, कु. सुप्रिया भास्करराव कंकाळ, रोहन कैलासराव देशमुख हे 9 विद्यार्थी गुणवत्तेने उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या यशाबद्दल मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत, उपमुख्याध्यापक एस. आर. कुंटूरकर, पर्यवेक्षक एम. डी. अडेराव, विभागप्रमुख बालाजी कदम आणि सर्व शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Photos