कामगार नेते कॉ.जी.एम.मगरे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)शासकीय औद्योगिक कामगार संघटनेच्या माध्यमातुन पाटबंधारे, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आदी सरकारी क्षेत्रातील कामगारांना संघटीत करुन न्यायासाठी लढा देणारे कॉ.जी.एम.मगरे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लोहा तालुक्यातील बेरळी या त्यांच्या मुलीच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

कॉ.जी.एम.मगरे यांनी पाटबंधारे खात्यातील यांत्रिकी विभागात प्रदीर्घकाळ शासकीय सेवा केली. या दरम्यान दिवंगत कामगार नेते कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्या मार्गदर्शनात शासकीय औद्योगिक कामगार संघटनेच्या माध्यमातुन मजबुत संघटन बांधले शेकडो कामगारांना न्याय मिळवुन दिला. पाटबंधारे विभागात प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर निवृत्ती मिळाल्यानंतरही कामगार संघटनेचे त्यांचे कार्य अविरत सुरुच होते. राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना व कामगार समन्वय समितीत त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. शासकीय कर्मचार्‍यांच्या संघटनात्मक बांधणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. मगरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्य कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक ना.रा.जाधव, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ.के.के. जांबकर, कॉ.ओ.के. जोशी, सरकारी कर्मचारी संघटनेचे श्रीराम पाटील, डी. एम. टेकाळे यांनी बेरळी येथे धाव घेतली. कॉ. जी. एम. मगरे यांच्या पार्थिवावर बेरळी येथे गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Photos