Breaking news

राजे मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे वसरणी येथील अहिल्यानगर येथे हिंदवी स्वराज्याचे विस्तारक, जगातील सर्वोत्कृष्ट योद्धा व मुत्सद्दी राजे मल्हारराव होळकर यांची 324 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नामदेव काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच गंगाधरराव काळे, मोबीन शेख, दीपक मोरे, व्यंकटी डुकरे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.
यावेळी युवा नेते विलासभाऊ काळे, रंगनाथ काळे, मोहन काळे, रमेश काळे, लवकुश काळे, भावराव काळे, दीपक काळे, अक्षय काळे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Related Photos