Breaking news

रास्तभाव दुकानदारांच्या मागण्यांकरीता नांदेड तहसील येथे धरणे संपन्न

लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याचे संघटनेचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)रास्तभाव दुकानदार संघटना जिल्हा शाखा नांदेडच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दुपारी 2 ते 4 वेळेत नांदेड तहसील कार्यालय येथे प्रचंड धरणे आंदोलन संपन्न झाले.

या बाबत संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कळविण्यात आले आहे की, अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत वाहतूक ही हमाली मुक्त करुन द्वारपोच योजना सुरु करावी, रास्तभाव दुकानदारांना मानधन देण्यात यावे, डाटा किलेर करण्यात यावा, ऑनलाईन नोंदणी निशुल्क करण्यात यावी, ई.पीओएस मशिन चालविण्याचे एका महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, ई.पीओएस मशिन बंद पडल्यास पूर्वीप्रमाणे लिखित पावती करुन धान्य वितरणाची परवानगी द्यावी यासंबंधीचे निवेदन नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांना देण्यात आले. या प्रसंगी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विजय चव्हाण हे उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी अन्नधान्य व साखर उचल करुन लाभार्थ्यांना वाटप करावे, असे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले असून रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, मा.न्यायालयामध्ये न्याय मागण्यांचे संघटनेच्यावतीने ठरविण्यात आले असून सनासुदीच्या काळामध्ये लाभार्थी यांना त्रास होवू नये व जिल्हा पुरवठा विभागास रास्तभाव दुकानदारांनी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. धरणे आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष अशोक एडके, विजयदादा सोनवणे, देवानंद सरोदे, नंदकुमार बनसोडे, रमेश गांजापूरकर, सुभाष काटकांबळे, श्रीमती रमाबाई तिवारी, श्रीमती कमलबाई लांडगे, बालाजी सुर्यवंशी, अब्दुल एजाज, शाहुराज गायकवाड, अरुण कांबळे, शेख मुस्तफा, शेख सन्मान, अशोक कापसीकर, नारायणराव गायकवाड, विजय रावळे, उध्दव कल्याणकर, बळवंत सुर्यवंशी, अशोक पटकुटवार, योगेश बारडकर, किशन सावंत, बाबाराव लोकडे, अनिल कुलकर्णी, श्रीदत्त घोडजकर, पांडूरंग गोडबोले, नजोद्दीन, अख्तर पाशा, मारोती कांकाडीकर, विजय मोरे यांच्यासह रास्तभाव दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Photos