Breaking news

अपघातातील जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यु, वाहन चालकावर गुन्हा दाखल

नविन नांदेड (प्रतिनिधी) ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी पुयड रोडवर लालवाडी गावाजवळ मित्रांसोबत बोलत असलेल्या दोन जनांना भरधाव वेगात येणा-या मारोती कारने उडवल्याने यातील एक जन गंभीर जखमी झाला होता त्याचा खाजगी रग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुध्द् ग्रामीण पोलीस स्थानकात मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र प्रकाश श्रीरामे वय 25 रा.जुना कौठा, नांदेड व त्याचा मित्र शिवानंद साहेबराव पुयड हे दोघे दि.05 मार्च रोजी रात्री 08.00 च्या सुमारास वाडी पुयड रोडवर लालवाडी जवळ उभे टाकले असता मारोती कार एम.एच.20 यु.0068 च्या चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून धडक दिल्याने यातील जितेंद्र प्रकाश श्रीरामे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर त्यांचा मित्र शिवानंद पुयड हा ही जखमी झाला. उपचार चालू असताना दि.11 मार्च रोजी जितेंद्र प्रकाश श्रीरामे याचे निधन झाले. याप्रकरणी एकनाथ काशीराम धामणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ग्रामीण पोलीस स्थानकात 304अ, 279, 337, 338, 38 भादवि नुसार मारोती कारच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण नेहरकर हे अधिक तपास करत आहेत.

Related Photos