Breaking news

राज्य युवा पुरस्कारने पर्यावरण व वन्यजीव संरक्षण सेवाभावी संस्था सन्मानित

नांदेड(खास प्रतिनिधी)युवक व क्रीडा मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा सन 2015-16 चा "राज्य युवा पुरस्कार" महाराष्ट्र शासनाने पर्यावरण व वन्यजीव संरक्षण सेवाभावी संस्थेस नुकताच शालेय शिक्षण,युवक व क्रीडा, उच्य व तंत्रशिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री माननीय विनोदजी तावडे साहेब यांच्या हस्ते सन्मानपूर्वक मुंबई येथे प्रदान करून संस्थेला गौरविण्यात आले.संस्थेच्या वतीने विनोद कुटे पाटील, मारोती गणगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्याला डॉ.मिलिंद भोई, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त राजाराम माने, सहसंचालक नरेंद्र सोपल,उप संचालक नागेश मोटे आदींच्य प्रमुख उपस्थितीत राज्य युवा पुरस्कार देऊन संस्थेस गौरविण्यात आले. संस्थेला याही पूर्वी महाराष्ट्र शासनाने समाज उपयोगी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे. संस्थेला हा पुरस्कार युवकांच्या मदतीने वनेत्तर क्षेत्रात वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन,पर्यावरणाचा झालेला ऱ्हास थाबवने, गौण खनिजाची होणारी लुट थांबवणे , पर्यावरणाच्या झालेल्या ऱ्हासाचे शाश्वत विकासात लोकसहभागातून पुनर्वसन करणे,पाण्याची होणारी नासाडी थाबवने , वन्य जीवाचे संरक्षण,सर्प विज्ञान समज गैर-समज प्रचार आणि प्रसार, एड्स जनजागरण, आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिर,पर्यावरण पूरक सण कृतीतून साजरेकरणे,राष्ट्रीय एकात्मते साठी समाजात विधायक प्रयत्न युवकांच्या मदतीने करणे, या युवक कल्यान कार्यात युवा विकासाचे कार्य केल्याबद्दल हा राज्य युवा पुरस्कार या संस्थेस देऊन गौरविण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव विनोद कुटे पाटील यांनी दिली.

संस्थेने केलेल्या कामाचा गौरव व्हावा आणि सामाजिक तसेच समाज हिताचे कार्य करण्यास प्रोसहान मिळावे या उद्देशाने पर्यावरण व वन्यजीव हा पुरस्कार दिला आहे . या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्थि पत्र , सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे आहे.हा पुरस्कार संस्थेला जाहीर झाल्याबद्दल प्रा.डॉ. एल. एम.वाघमारे, प्रा.डॉ.बी एम.पत्रे, प्रा.डॉ.एस.टी.हामदे, प्रकाश पाटील चितळकर, बळीराम पाटील जनापुरीकर, झरी चे सरपंच सौ द्वारका विलास रिंगे,उपसरपंच उत्तमराव गिरे, शामराव पाटील गिरे, तुळशीराम गिरे,डेरल्याचे सरपंच बालाजी शिंदे आदींनी अभिनंदन केले.

Related Photos