आदर्श सिडको भुषण पुरस्कार सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.जी. बायस यांना जाहीर

नवीन नांदेड(प्रतिनिधी)सिडको हडको शिवसेनेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आदर्श सिडको भुषण पुरस्कार यावेळेस शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणार्‍या सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.जी. बायस यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 28 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहीती आयोजक तथा माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे यांनी दिली.

दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींना सिडको आदर्श पुरस्कार देण्यात येतो. यावेळेसचा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.जी. बायस यांना जाहीर करण्यात आला. याबाबत काल झालेल्या समितीच्या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक धोंडु पाटील, माजी नगरसेवक डॉ. अनिल सातारकर, पत्रकार संघाचे रमेश ठाकुर, किरण देशमुख, तुकाराम सावंत, निळकंठ वरळे, संभाजी सोनकांबळे, सारंग नेरलकर, दिगांबर शिंदे, निवृत्ती जिंकलवाड, ब्रिजलाल उगवे, कृष्णा पांचाळ, स्मिता कुलकर्णी, संजय काचावार, तुळशीराम पारडे, एम.एस. पठाण व आयोजक राजेंद्र कुलथे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. सदरील पुरस्कार मराठी नववर्षानिमित्त 28 मार्चरोजी प्रदान करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Related Photos