श्री संत गुरु रविदास महाराज मंदिर सिडकोच्या सातवा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नविन नांदेड(प्रतिनिधी)श्री संत गुरु रविदास महाराज मंदिर सिडकोच्या सातवा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दि.25 मार्च रोजी प्रवचनकार डॉ.त्रिपूरारीदास महाराज, बनारस यांचे प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.25 मार्च राजी सकाळी 11.00 वाजता एकनाथराव लाठकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असून यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून नांवाशमनपाच्या स्थायी समिती सभापती सौ.मंगलाताई देशमुख, माजी सभापती विनय पाटील गिरडे, अखिल भारतीय रविदास समाज संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव दुधंबे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाधक्ष माधवराव गायकवाड, भारतीय रविदासीया धर्मसंघटन महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय अध्यक्ष बालाजी दुधंबे, अ.भा.गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अस्तिक कोरडे यांची उपस्थिती राहणार असून यावेळी डॉ.त्रिपूरारीदास महाराज, बनारस यांचे प्रवचनाचेही आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष ब्रम्हाजी गायकवाड, किशन दुधंबे, शंकर पेटकर, संभाजी घडलिंगे, रानबा वानखेडे, व्यंकटराव सोनटक्के, व्यंकटराव दुधंबे, भारत सोनटक्के, श्रीराम गोरे, चांदोजी सोनटक्के यांनी केले असून कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Photos