Breaking news

आयात उमेदवार नको... सरसम बु.जी.प. गटातील मतदारांत चर्चा

हिमायतनगर(अनिल मादसवार)आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक मतदार संघातील उमेदवारांना प्राध्यान्य देण्यात यावे. असा सूर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यामधून उमटत असून, आयात उमेदवार आम्ही चालू देणार नाही अशी ठोस भूमिका आता मतदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर राजकीय नेत्यांना विचार करण्याची वेळ आली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती सदस्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यातील निवडणूक होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जवळपास अनेक इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सर्वच पक्षाने पार पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आपापल्या मतदार संघात रात्रंदिवस कामाला लागले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा, बसपा, सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील बहुजन महाआघाडी या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याने हि निवडूक रंगतदार होणार आहे.

माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे हदगाव - हिमायतनगर तालुक्यात चांगले वर्चस्व असल्याने व विद्यमान आ.नागेश पाटील यांचाही दांडगा संपर्क असल्याने खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारात होणार असल्याचे स्पस्ट चित्र दिसून येत आहे. माधवराव पाटील यांची राजकीय ताकत पाहता कामारी जिल्हा परिषद मतदार संघ हा जवळगावकरांचा पूर्वीपासूनच बालेकिल्ला राहिलेला आहे. तर सरसम जिल्हा परिषद मतदार संघ हा मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या ताब्यात होता. परंतु माधवराव पाटील यांच्या आमदारकीच्या काळात त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन जनतेने या गटात काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून दिला होता. एकंदरीतच राजकीय परिस्थितिचा आढावा घेतल्यास सत्ताधार्यांसोबत राहण्याचा या मतदार संघातील जनतेचा स्वभाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेससह, राष्ट्रवादी, भाजपा, बसपा, महाआघाडीच्या उमेदवारांना काट्यावरची कसरत करत उमेदवार द्यावे लागणार आहे. या भागात मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार देण्याच्या तयारीत प्रमुख पक्ष असल्याची जोरदार चर्चा इच्छुक उमेदवारांमधून होत आहे. त्यामुळे या भागातील मतदार जनता आता थेट स्थानिक मतदार गटातील उमेदवार देण्यात यावा अशी मागणी करत आहेत. असे न करता बाहेरील उमेदवार लादल्यास संबंधित पक्षांना पराभवाचे तोंड पाहावे लागणार हे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.

जनतेच्या मनातील सक्रिय उमेदवाराचाही चाचपणी प्रमुख पक्षाचे पक्ष निरीक्षक करत असले तरी केवळ गब्बर पैसेवाला उमेदवार म्हणून आयात उमेदवार न देता जनतेच्या मनातील, अडीअडचणीला धावून जाणार्या सक्रिय कार्यकर्त्याला पक्षाची उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह मतदार संबंधित नेत्याकडे धरत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीतील निकालावर विधानसभा लढऊ इच्छिणार्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे आयात उमेदवार देण्याचा विचार करणाऱ्या राजकीय पक्षांना व नेत्यांना प्राबल्य उमेदवार ठेवायचा असल्यास स्थानिक होतकरू कार्यकर्त्यास राजकीय पक्षाने उमेदवारी द्यावी. अन्यथा मतदार राजा बाहेरील आयात उमेदवारास घरचा रस्ता दाखविणार असल्याच्या प्रतिक्रिया सरसम गटातील मतदारांत होत असलेल्या चर्चेवरून दिसून येत आहे.

Related Photos