Breaking news

जि.प.पं.स.निवडणूकीत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली

मुखेड(शेख बबलु)आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मुखेड - कंधार तालुक्यात तोंडीस तोड उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मिळणार असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळणार आहे सध्याच्या या काडाक्याच्या थंडीत कार्यकर्त्यांची चांगलीच कसोटी होणार आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आपच्या पक्षाची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुखेड - कंधार विधानसभा मतदार संघातील ९ जिल्हा परिषद व १९ पंचायत समितीच्या जगासाठी मुखेड तालुक्यातील मुक्रामाबद , बा-हाळी, एकलारा , जांब ,सावरगाव चांडोळा, येवती गट ७ आहेत तर मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघातून कुरळा गट , पेठवडज गट, २ असे एकुण जि. प. गटासाठी ९ तर पंचायत समिती गणसाठी गण जांब, वर्ताळा, चांडोळा, बेटमोगरा , एकलारा, जाहुर, येवती, होनवडज, सावरगाव ( पि.), सकनुर, बा-हाळी , दापका( गुं ), मुक्रामाबाद, गोजेगाव ,मुखेड तालुक्यात १४ व मुखेड - कंधार विधानसभा अंतर्गत कुरुळा, पेटवडज, फुलवळ, असे संपूर्ण १९ जागांची साठी निवडणूक होणार आहे. इच्छुक उमेदवार पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी नेते मंडळीची भेटी घेत आहेत. सर्व पक्षानी आपापल्या पक्षाचे उमेदवारांची ची चाचपणी करुन घेत आहेत.

मुखेड तालुक्यातील नव्यनेच जिल्हा परिषद गट तयार झालेल्या सावरगाव ( पि.) हा महीला प्रवर्गासाठी राखीव झाला असुन या नव्या गटात भाजप - काँग्रेस - शिवसेना - रासपा - राष्ट्रवादी, या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची प्रतीष्ठा पणाला लागणार आहेत. या गटातुन निवडून जाणाऱ्या राखीव खुल्या महिला सदस्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर दावा राहणार असल्यामुळे नव्यानेच निर्माण झालेल्या जि. प. गटाला राजकीय दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. तसेच 'जांब' पंचायत समिती सभापती पदासाठी अोबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सुटल्याने जांब गण. हा. अोबीसी राखीव असल्याने सभापदी पदासाठी कोन मुसांडी मारून सभापती पदाच्या खुरचीवर कोन विराजमान होईल व जांब सर्कल मधून पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळणार असल्याने सर्व तालुक्यचे लक्ष सावरगाव सर्कल व जांब गणावर असणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते नेते यांनी आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात पाठवणार आहेत.

Related Photos