Breaking news

काँग्रेस इच्छूकांचे उमेदवारीसाठी आमदारकडे शक्तीप्रदर्शन

नरसीफाटा(सुभाष पेरकेवार)पक्षाकडुन उमेदवारी मिळो अथवा न मिळो परंतु काॅग्रेसचे दोन ईच्छुक उमेदवार उमेदवारी मलाच मिळावी म्हणून आपआपल्या पद्धतीने आ. वसंतराव चव्हाण यांच्याकडे शक्ती प्रदर्शन केले असल्याने उमेदवारीचा तिढा वाढला आहे.

उमेदवारी दाखल करण्याचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसे इच्छूकांच्या गोटात धाकधूक वाढली असून. कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी जोरदार चर्चा आहे. नायगाव तालुक्यातील मांजरम, बरबडा, कुंटूर व नरसी या चार गटासाठी तर टेंभूर्णी, मांजरम, कुष्णूर, बरबडा, देगाव, कुंटूर,नरसी व मुगाव या आठ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. पण माजरंम जिल्हा परिषद गटाशिवाय अद्याप कोणत्याच गट आणि गणातून कुणाचीही उमेदवारी अंतिम झाली नाही. भाजपाचे राजेश पवार हे मागील दोन महीण्यापासून तर शिवराज पा. होटाळकर यांनी मागील आठ ते दहा दिवसापासून आपल्या सौभाग्यवतीसाठी जोरदार कामाला लागले आहेत.

इच्छूक उमेदवार चाय पे चर्चा करत अनेक दिवसापासून चाचपणी करुन आपापल्या समर्थकांची जुळवाजुळव करुन मोर्चेबांधणीच्या कामाला लागले असले तरी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शिवसेना किंवा ईतर कोणत्याही पक्षाने आपापल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. तरी भाजपाचे व काॅग्रेसचे ईच्छुक उमेदवार आप आपल्या परीने मलाच उमेदवारी सर्कल मध्ये फिरताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार शंकर पाटील धानोरकर यांनी आपल्या सुपुत्राला उमेदवारी मिळावी म्हणून रविवारी नरसी गटातील सर्वच गावातील मतदाराला घेऊन नायगांव येथील आ . वसंतराव चव्हाण यांच्या सर्पक कार्यालयात जाऊन आपल्याला च उमेदवारी मिळावी म्हणून आमदार कडे मनधरणी करत शक्तिप्रदर्शन केले .यावेळी मोहनराव पाटील धुप्पेकर , गंगाजी ताटे , गणपतराव पा.धुप्पेकर , प्रा. दत्ता साखरे , दत्ता पाहोटाळकर , परसराम पा.कांडाळकर , सदाशिव पा. कुचेलीकर , बालाजी पा.भोपाळकर , बालाजी ताटे , खुशालराव लघुळे , माधवराव मुस्तापूरे , बाबुराव पा.जनकुले, धनराज जाधव , शामराव पा. चोडै , बालाजी भुरे , चेअरमन वसंतराव पा. खैरगाव  . माधवराव गुरूजी , बाबुराव गुरूजी , मारोती कंदुरके , आनंदराव काडांळा , शंकर सत्रे , यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते .

दुसर्‍या दिवशी सोमवारी लगेच दुसरे ईच्छुक उमेदवार डाॅ . मधुकर राठोड यांनी आपल्या शकडो समर्थकासह नायगाव येथील आ.वसतराव. चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात दाखल होऊन उमेदवारी मिळण्यासाठी आ.चव्हाण यांच्या कडे साकडे घातले .यावेळी रतनमामा राठोड , के.आर.राठोड , मधुकर ताटे , लालबा सुर्यवंशी , राजु बागडे , नामदेव गुरूजी , परमेश्वर धुमाळे , उत्तम पा.मुस्तापूरकर , साहेबराव गायकवाड , राहूल पा . नकाते , वसंत पा . खैरगाव , रामेश्वर घंटेवाड . यादवराव भेलोन्डे , उत्तम राठोड , गणपतराव पा.धुप्पेकर , सदाशिव पाटील , गंगाधर पाटील , हानमंत हांनमते , पंडित पा. बसवदे , गुणवंत पा. डाकोरे , शेख बाबण साब , बाबुराव जाधव , मारोती पा. कुऱ्हाडे , संभांजी पाटील , नारायण पा. गाडले , माधव डोनगावे , प्रकाश पा. होटाळकर , गणेश पा.होटाळकर , संरपच किरण कदम आदींच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले . दोन दिवस दोन इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी साठी शक्तीप्रदर्शन केले तर तीसरे इच्छुक उमेदवार माजी सभापती सय्यद रहीम शेठ हे आहेत पण सय्यद रहीम यांची प्रबळ दावेदारी मानल्या जातं असून इच्छुक सर्वच उमेदवारापेक्षा सय्यद रहीम हेच नरसीत चांगलीच लढत देऊ शकतात यामुळे नरसी गटात सय्यद रहीम हेच उमेदवार राहतील यांची उमेदवारी निश्चित मानल्या जात असले तरी उमेदवारी देताना आ.वसंतराव चव्हाण यांना मोठी कसरत करावी लागणार आहे , यावेळी आ.वसतराव चव्हाण , डि.बी.पाटील होटाळकर , तालुकाअध्यक्ष संभाजी पा.भिलवंडे , श्रीनिवास पा.चव्हान ,  सय्यद ईसाक , आदीजण उपस्थित होते  या तीघापैकी ऐन वेळीउमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे आनेकांचे लक्ष लागले आहे.

Related Photos