Breaking news

विकासाच्या ध्येयाने झपाटलेला युवा नेता माधवराव पाटील जवळगावकर

हदगाव व हिमायतनगर तालुक्याला मागील तीन दशकाच्या कालावधीत विकासाची जाण असलेला राजकीय नेता मिळाला नव्हता. त्यामुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील विकास खुंटला होता. तसेच मुलभूत सोयी-सुविधा अभावी नागरिकांची हेळसांड होऊन विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. विकासाला खिळ बसल्याने जनतेनी भूतो ना भविष्यती अश्या मताधिक्याने हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या नेतृत्वाची संधी माधवराव पाटील जवळगावकर यांना दिली. त्या संधीचे सोने करत रस्त्यांपासून ते पाणीटंचाई पर्यत शैक्षणिक सुविधा पुरविण्यापासून ते आरोग्यापर्यतच्या असंख्य समस्यांचा अंधार दूर करण्याच्या दृष्टीने झपाटलेला युवा नेता माधवराव पाटील जवळगावकर यांच्या रूपाने मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अल्पसा परिचय आपणासमोर मांडत आहोत.

श्री मा.आ.माधवराव निवृत्तीराव जवळगावर यांचा जन्म हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथे सण १९७२ साली झाला होता. त्यांच्या घराला राजकीय वारसा लाभल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. दरम्यान त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण घेऊन मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा अवगत केली. तसेच बाल वयात स्व. माजी आ. निवृत्ती पाटील, स्व. पंजाबराव पाटील, यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी भेट झाली. त्यादरम्यान माधवरावांची कार्य कुशलता, हुशारी पाहून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबानी डोक्यावर हात ठेऊन राजकीय क्षेत्रात पाठवा त्याला मी घडवितो असा शब्द निवृत्तिरावांना दिला होता. चव्हाण साहेबांच्या नेतृत्व व मार्गदर्शनखाली दोन्ही तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढविण्याबरोबर जनसामान्यांच्या अडी - अडचणीला धावून जात माधवरावांनी जनमानसात आपली प्रतिमा तयार केली. सण २००० ते २००५ काळात जवळगाव येथील उपसरपंच पद, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, कै. विठाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षस्थान, सण २००२ ते २००८ च्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद, २००५ ते २००९ च्या काळात हिमायतनगर तालुका काँग्रेस आय कमिटीचे तालुकाध्यक्षपद भूषविले. दरम्यानच्या काळात आदिवासी मेळावे, सामूहिक विवाह मेळावे, यासह धार्मिक, सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभागी होऊन ते पार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला.

त्यांच्या या सामाजिक कार्याची धडपड पाहून दोन्ही तालुक्यातील जनता विकासाच्या वाटेवर नेणारा नेता माधवरावंच आहे. हे ओळखून सन २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणले. आणि माधवराव पाटील जवळगावकर यांच्या रुपाने विकासाचा झगमगता युवा नेत्याला ४४ हजार ७८१ च्या मताधिक्याने निवडून देऊन, हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे नेतृत्व व प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. जनतेच्या आशिर्वादाला शिरसंधान मानून माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी विकासाचा अनशेष भरून काढून लोकहिताचे कामे मार्गी लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन दोन्ही तालुक्यात विकासाची गंगा आणली. त्यामुळे आज घडीला माजी आ. जवळगावकर याच्या दुरदृष्टीतून हदगाव - हिमायतनगर तालुका विकासात्मक दृष्टीने समृद्ध झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.

हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक चळवळ गतिमान करून दोन्ही तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा.राजीव सातव, आ. डी.पी. सावंत, अमरभाऊ राजूरकर यांच्यासह पक्ष स्रेष्टीच्या सहकार्यामुळे जनतेच्या कायम स्मरणात राहतील अश्या भव्य दिव्य तहसील, पंचायत समितीच्या इमारती, हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, समाज भवन यासह अनेक विकासात्मक कामे करून ग्रामीण भागातील रस्ते पक्क्या रस्त्याशी जोडले. तसेच विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर उच्चं पातळीचा बंधारा उभा करून सिंचनाचे स्वप्न साकार केले. तसेच खा.राजीव सातव यांच्या माध्यमातून वाळकेवाडी येथील रामबापू महाराज मंदिरासह गावाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलबध करून देऊन एक सक्षम व कर्तबगार राजकीय नेतृत्व सिद्ध केला. तसेच डांबरी रस्ते व सिंचनाच्या प्रश्नाची सोडवणूक करित विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचा सातत्याने प्रयत्न केला. सद्यस्थितीत हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील गावागावात व वाडी - तांड्यात रस्त्याचे जाळे विणल्या गेले असून, विकास कामासाठी मा. आ. जवळगावकरानी कोट्यावधी रुपयांचा निधी आघाडी सरकार कडून खेचून आणला.

तसेच आमदारकीच्या काळात दोन्ही तालुक्यातील पिंपळगाव येथील दत्त मंदिर, हिमायतनगरचे परमेश्वर मंदिर, बोरगडीचे मारोती मंदिर यासह अनेक प्रसिद्ध देवस्थानाना आ. जवळगावकर यांनी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. तसेच देवस्थान स्थळ व परिसराच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी तीर्थ क्षेत्रासाठी खेचून आणून विकास केला. यातून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली सभा मंडप, सिमेंट रस्ते उभारण्यात आले. त्याच बरोबर शैक्षणिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला आग्रक्रम दिला. नागरिकांना मूलभूत सोयी - सुविधा पुरविता आल्या तरच सर्वागिण विकास झाला असे म्हणता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन माजी आ. जवळगावकर यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केले. त्यानंतर उद्भवलेल्या पूरपरीस्थीतीने नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत मिळवून दिली. विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २०१० मध्ये वसंत सहकारी कारखाना पोफळीच्या निवडणुकीत २३ पैकी २३ संचालक निवडून आणून शेतकऱ्यांचा ऊस नेऊन नुकसानीपासून वाचविले. तसेच हदगाव खरेदी - विक्री संघाच्या निवडणुकीत १७ पैकी १३ संचालक निवडून आणून शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केला. तसेच २०११ पासून हदगाव येथील नागरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करून काँग्रेसची सत्ता कायम ठेवली. तसेच दोन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले. आणि नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांतही मोठे यश मिळविले असून, आगामी होऊ घातलेल्या जिल्हा - परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ताब्यात घेण्यासाठी गावागावात, मतदार संघात भेटी गाठी घेऊन जनतेच्या मनातील उमेदवार देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या याच कार्यकुशलतेला मानणाऱ्या मतदारराजा व नागरीकातून हदगाव - हिमायतनगर तालुक्यात विकासाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या माजी आ.माधवराव पाटील जवळगावकरांना पुन्हा विधासनसभेत पवाठविणार असल्याचे बोलून दाखवीत आहेत. आज पदावर नसतानाही तालुक्याचा विकास हेच ध्येय ठेऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून प्रणाम व कोटी कोटी शुभेच्छा.... अनिल मादसवार, संपादक, नांदेड न्यूज लाईव्ह....९७६७१२१२१७, ९७६४०१०१०७
http://www.nandednewslive.com/Rang_satteche-19782-588894c626fe8-1.html

Related Photos