Breaking news

ना काँग्रेस प्रवेश...ना अधिकृत उमेदवारी....माजी.आ.रोहिदास चव्हाण फिरतात कन्येसाठी दारोदारी

कंधार(मयुर कांबळे)काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेले लोहा कंधार तालुक्याचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा मा.आ.रोहिदास चव्हाण यांनी पक्षाचा भंग करत आपल्या कन्येचा प्रचार आनाधिकृतपने केल्यामुळे येथील जुन्या काँग्रेस समर्थकांनकडून नाराजगी व्यक्त झाल्याचे चित्र कंधार तालुक्यात पहावयास मिळत आहे ना पक्ष प्रवेश,ना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी प्रचारासाठी फिरे दारो दारी रोहिदास चव्हाण लय भारी अशी म्हंनण्याची वेळ येथील जुन्या व अनेकवर्ष कंभर कसलेलेल्या काँग्रेस कार्यकर्ते,समर्थकांनवर आली आहे.

सध्या सर्वत्र निवडणुकांचे बिगुल वाजले असुन माजी,आजी,आमदार,जि.प.सदस्य,कंभर कसुन प्रचार गावो-गावी करत आहेत.आनेकांनी आपलाला तिकीट मिळावे यासाठी धडपड सुरुकेली आहे.परंतु पक्ष कोणास तिकीट जाहिर करणार या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.काँग्रेस पक्षात नव्याने रुजु झालेले मा.आ.रोहिदास चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा भंग केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांची मुलगी तथा विद्यमान जि.प.सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांची पत्नी सौ.मनीषा पुरुषोत्तम धोंडगे यांचा ना पक्ष प्रवेश,ना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी नसुन देखील मा.आ.रोहिदास चव्हाण यांनी बहाद्दरपुरा गटात फिरुण गाटी-भेटी घेतल्या असल्यामुळे चर्चेला चांगलेच वळण लागले आहे.जावई शेकाप पक्षाचे आन सासरे काँग्रेस पक्षाचे आन मग प्रचार नेमका कोणाचा काँग्रेस चा का शेकाप चा हे कोडे उलघना सारखे झाले आहे. बहाद्दरपुरा गटातुन काँग्रेस पक्षास जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर,सौ.मनीषाताई धोंडगे यांनी पक्ष निरीक्षकांनकडे मागणी केली आहे.परंतु पक्ष कोणास तिकीट देणार अनेकवर्ष कंभर कसलेलेल्या काँग्रेस कार्यकर्ते,समर्थकांना देणार का ? पक्षात प्रवेश न करताच मी काँग्रेसचाच म्हणाऱ्यानां काँग्रेस पक्ष तिकीट देईल का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नगर परिषदेच्या प्रचारार्थ कंधार शहरात सभेसाठी आले असता त्यांनी माजी.खासदार भाई केशवराव धोंडगे यांच्या निवास्थानी अचानकपने भेट घेतली त्यामुळे या भेटी मागचे नेमके कारण काय ? हे बहाद्दरपुरा गटातील मतदार बांधव जाणून घेण्यासाठी उस्तुक आहेत.भाई केशवराव धोंडगे हे 25 वर्ष आमदार व 5 वर्ष खासदार शेकाप पक्षाकडून एकनिष्ठ राहिले आहेत व त्यांचे चिरंजीव आड.मुक्तेश्वरभाऊ धोंडगे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी कडून लढवली आहे त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लोहा येथे घेण्यात आली होती.एका घरात तीन वेगवेगळे पक्ष आहेत काँग्रेस,भाजपा,शेकाप.तिकीट कोणच्या पक्षाचे सौ.मनीषा धोंडगेंनां मिळणार हे पाहण्यासाठी तालुका आतुर आहे परंतु काँग्रेस चे रोहिदास चव्हाण हे आपल्या मुलीचा प्रचारासाठी फिरत आहेत यामागचे नेमके कारण काय असेल हे अद्याप कळू शकले नाही.काय त्यांचे तिकीट काँग्रेस पक्षाकडून निश्चित झाले आहे का ? हा प्रश्न उदभवत आहे.कंधार लोहा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या स्थापणे पासुन ते आजपर्यंत निष्ठावंत राहिलेले माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी आपला जिव पनास लावला आणि गावोगावी फिरून पक्ष वाढवन्याच काम केल आणि आख आयुष्य काँग्रेस मधे घालवल व त्यांच्या सुनबाई देखील मागील दहा वर्षांन पासुन काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत आणि फुलवळ गटाच्या त्या विद्यमान जि.प.सदस्या आहेत.त्यांनी काँग्रेस पक्षाचे नाव उंचावण्यासाठी फुलवळ गटात वाडी तांडयानवर अनेक विकास कामे करुण पक्षाचे नाव उंचावले आहे.मग पक्ष तिकीट कोणास देणार काँग्रेस पक्षाचा आयुष्यभर विरोध करणारे शेकाप चे भाई केशवराव धोंडगे यांच्या सुनेला का ? भोसीकर यांच्या सुनेला ? हा भयंकर सवाल उदभवत आहे. हा खेळ मोठा गुंता गुंतीचा आहे.या गोष्टीचे याड संबंध तालुक्यातील व बहाद्दरपुरा गटातील मतदार बांधवानां लागले आहे.

Related Photos