Breaking news

भाजपा - सेनेच्या विरोधी धोरणामुळे काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण...!

निवडणुकीच्या रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून, दि.१६ गुरुवारी मतदान होणार आहे. दरम्यान होत असलेल्या जाहीर सभामध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस - सेनेच्या आजी - माजी आमदारांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, त्यांच्या प्रतिष्ठेला भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे तगडे आव्हान उभे आहे. त्यामुळे सरसम जिल्हा परिषद गटात त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून, नाकर्त्या पुढाऱ्यामुळे मतदारांसमोर मतांचा जोगवा मागताना उमेदवारांच्या नाकी नऊ येत आहेत. निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांच्या चलतीवर सेना - काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य दिसून येत असले तरी, माजाची आ.माधवराव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या दूधड - कामारी मतदार संघात मोठ्या मताधिक्याने काँग्रेस पक्षाला विजयश्री खेचून देणार असल्याची राजकीय परिस्थिती दिसून येत आहे.

सरसम जिल्हा परिषद मतदार सांघात काँग्रेस व सेना या दोन प्रमुख पक्षाच्या उमेदवारात लढत होणार आहे. आदिवासी समाजाची मते सरसम पंचायत समिती गणात निर्णायक ठरणार आहेत. नव्यानेच राष्ट्रवादीला रामराम ठोकून सभापती पदावर डोळा ठेवून शिवसेनेशी घरोबा करणाऱ्या प्रतापरावांच्या इंट्रीने निष्ठावंत शिवसैनिकांचा ताप वाढला आहे. नाराज शिवसैनिक व्दिधा मसनस्थितीत असून, तर आयात उमेदवार लादल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते याच मूडमध्ये असल्याने अंदाज बंधने कठीण झाले आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात विद्यमान आमदार नागेश पाटील यांनी मतदार सांघात भासत असलेली उणीव व सैरभैर झालेले शिवसैनिक भाजपशी जवळीक साधत असल्याने माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा चांगला जम बसू लागला आहे. सरसम पंचायत समिती गणात काँग्रेस पक्षाकडून सर्वसाधारण जागेवर इतर मागास प्रवरांगातील उमेदवार लादला गेल्याने इच्छुक मराठा उमेदवारांची नाराजी काँग्रेस पक्षाला भोगण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आयत्या वेळी उमेदवारी पदरात पाडून घेतलेले शिवसेनेच्या उमेदवाराला निष्ठावंत शिवसैनिकांच्या रोषाचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली असल्याने जवळपास चार हजार मतदान असलेल्या आदिवासी बांधवांचा कौल या पंचायत समिती गणात निर्णायक भूमिका बजावणार आहे. मात्र जी.प. च्या उमेदवार सौ. ज्योत्सना जोगेंद्र नरवाडे व पंचायत समितीच्या उमेदवार सौ.माया राठोड यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने माजी आ.माधवराव पाटील यांच्यावर असलेल्या सहानुभीतीच्या लाटेचा फायदा या दोन्ही उमेदवाराला होणार असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवीत आहेत. तर सिरंजनी पंचायत समिती गणात काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले युवा कार्यकर्ते सोपान बोंपीलवार याना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने भाजपच्या तंबूत दाखल होऊन निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द माजी खा.सुभाष वानखेडे शर्तीचे प्रयत्न करत असल्याने व एक पत्रकार व समाजीक कार्यकर्ता म्हणून दांडगा जनसंपर्क असल्याने बोंपीलवार यांच्याबाजूने युवकांची मोठी फळी उभी आहे. त्यांच्या याच गुणामुळे मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याने या ठिकाणी भाजपचे कमळ फुलून अच्छे दिन येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरसम जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचा प्रचार संथगतीने होऊ लागल्याने शिवसेनेची हवा कमी असल्याचा भास राजकीय वर्तुळातील जाणकार वर्तवीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवाराने प्रचारात उडी घेतल्याने आदिवासी एकगठ्ठा मतदान एका बाजूने वळणार असल्याचे प्रतिक्रिया आदिवासी समाजाच्या उमेदवाराने समाज बांधवाना न विचारता उमेदवारी परत घेतल्याने काही बांधव बोलून दाखवीत आहेत. भाजपने दिलेले जिल्हा परिषदचे उमेदवार हा बौद्ध समाजाचा तर पंचायत समितीचा उमेदवार पुरोगामी मराठा समाजाच्या असून, दोन्ही महिला उमेदवार ह्या विशेष करून स्थानिक सरसम बु. गावाच्या लेकी आहेत. त्यामुळे निश्चितच वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद त्यांना मिळणार असल्याचे चित्र प्रचाराच्या रणधुमाळीतून दिसून येत आहे.

गेल्या अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या दुधड - कामारी मतदार संघात माजी बालकल्याण सभापती राहिलेल्या श्रीमती शांताबाई पवार यां निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. तसेच नुकतेच दोन माजी मुख्यमंत्र्याच्या सभा झाल्याने मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने वाढला आहे. माजी आ.माधवराव पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाचे फलितही काँग्रेस उमेदवारांच्या पारड्यात पडणार आहे. तर इच्छुक २२ उमेदवारही आपापल्या गावातून जास्तीत जास्त लीड देण्यासाठी प्रयत्न करत असल्याने जवळगावकर घराण्यावर या भागातील जनतेचे प्रेम असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीसह तिन्ही जागांवर एकतर्फी विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. कारण शिवसेनेने दिलेला उमेदवार हा नवखा असल्याने मतदारांना त्यांची ओळख नाही. तसेच शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने मतदार शिवसेनेच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत आहेत. एवढेच नव्हे तर या गटात अनेकांना उमेदवारीसाठी कोपरयात गूळ लावून ठेवल्याने नाराज झालेले जेष्ठ कट्टर शिवसैनिक किशनराव वानखेडे हे भाजपच्या तिकीटावरून निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. तर पाणी टंचाईच्या परिस्थितीने हैराण झालेल्या गावातील नागरिक मतांचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना खडे बोल बोलून माघारी पाठवत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, बसपाचाही उमेदवार या भागात असल्याने थोडेफार मतविभाजन झाले तरी दुधड - कामारी गट हा काँग्रेसला निर्विवाद सत्ता प्राप्त करून देणार असल्याचे चित्र राजकीय विशलेषकातून वर्तविला जात आहे.

Related Photos