Breaking news

जि.प. च्या बळीरामपूर व वाजेगाव गटात कोण निवडुन येणार याबाबत तर्कवितर्क

नवीन नांदेड(रमेश ठाकूर)जिल्हा परिषदेच्या बळीरामपूर व वाजेगाव गटात मतदान झाल्यानंतर या दोन्हीही गटातून व चार पंचायत समिती गणातून कोण निवडुन येणार याबाबत तर्कवितर्क काढण्यात येत असून कार्यकर्तेही आपलाच उमेदवार निवडुन येईल का या बाबत तर्क वितर्क लावत आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर जि.प. च्या बळीरामपूर व वाजेगाव गटात व पं.स. च्या वाजेगाव, विष्णुपूरी, कामठा, बळीरामपूर गणात सरासरी 70 टक्के मतदान झाले. वाजेगाव गटात एकूण पाच उमेदवारात निवडणुक झाली असली तरीही येथे तिरंगी लढत झाली. यात शिवसेनेचे आनंद शंकरराव तिडके, भाजपाचे बालाजी मोतीराम पुयड व कॉंग्रेसचे मनोहर गणेशराव शिंदे यांच्यात तर पं.स. गणात पाच उमेदवारात निवडणुक झाली यात शिवसेनेच्या लक्ष्मीबाई कोंडीबा शिंदे, कॉंग्रेसच्या शेख हसीना बेगम शे. फईम, तर भाजपाच्या रंजना मदन शिंदे व अन्य दोन उमेदवारात निवडणुक झाली. या गणात तिरंगी लढतीचीच शक्यता वर्तविण्यात आली तर कामठा गणात चार उमेदवारात निवडणुक झाली. यात शिवसेनेचे बाळु पुंडलिक उबाळे, गोविंदराव दत्तराम जाधव, भाजपाचे प्रभु रामजी इंगळे, अपक्ष मंगेश मारोतराव वांगीकर यांच्यात निवडणुक झाली. येथेही तिरंगी लढतीचीच शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बळीरामपूरच्या जिल्हा परिषद गटात नऊ उमेदवारामध्ये निवडणुक झाली यात कॉंग्रेसचे गंगाप्रसाद काकडे, शिवसेनेचे बालाजी पांचाळ, भाजपाचे बालाजी नागोराव वैजाळे व बसपाचे गोविंद गंगाराम कोंके यांच्यासह अन्य उमेदवारात निवडणुक झाली. येथे तिरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर कॉंग्रेस - सेनेमध्ये झाल्याचे तर्कवितर्क काढण्यात आले. पं.स. च्या बळीरामपूर गणातही सहा उमेदवारात निवडणुक झाली यात शिवसेनेचे गोविंद विश्र्वनाथ सुंकेवार, कॉंग्रेसचे गंगाधर बापुराव नरवाडे, भाजपाचे शिवराज मारोतराव दासरवाड व अन्य उमेदवारात निवडणुक झाली. येथेही तिरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात आली. तर विष्णुपूरी पं.स. च्या गणात सहा जणामध्ये निवडणुक झाली. यात शिवसेनेचे डॉ. बालासाहेब संभाजीराव वाघमारे, कॉंग्रेसचे ऍड. राजु ग्यानोजी हटकर व भाजपाचे संजय शंकरराव भोरगे यांच्यासह अन्य तीन उमेदवारांचा समावेश होता. या ठिकाणी खरी लढत तिरंगी झाल्याचे बोलल्या जाते. या दोन्हीही मतदार संघात व पं.स. च्या चार गणात तिरंगी लढतीचा अंदाज वर्तविल्या जात असून मतदार संघात अनेक गावात कार्यकर्त्यांसह पदाधिकारी आपलाच उमेदवार निवडुण येईल असा अंदाज व्यक्त करत आहेत.

Related Photos