भारतोलन, शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी स्वारातीमचा संघ चंदीगडला रवाना

नांदेड(प्रतिनिधी)अखिल भारतीय आंतर विद्यापीठ भारतोलन, शरीर सौष्ठव स्पर्धा पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे दि.०६ ते ०९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.

या संघामध्ये परमाजे सुविचार, करणसिंघ गेहलोट, प्रवीण होळसांबरे, भयालाल कडपेवाला, परमज्योतसिंघ सिद्दू, ज्ञानेश्वर मांडवे, तुकाराम कल्याणकर, शेख निहाल, वैभव मारकंटेवार, सचिन झटे या विद्यार्थ्यांचा समावेश असून संघव्यवस्थापक डॉ. रमेश कदम, डॉ. बळीराम लाड आणि मार्गदर्शक विठ्ठलसिंह परिहार, डॉ. नितेश स्वामी रवाना झाले आहेत.

संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र- कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि एन. सरोदे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱयांनी शुभेच्छा दिल्या.

Related Photos