मुजिबशाहने पटकाविला ‘मराठवाडा श्री’

सौरभ बेलेकर व बुटासिंघ उत्कृष्ट शरिर सौष्ठवपटू
नांदेड(प्रतिनिधी)कबिर क्रीडा मंडळ व सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग चौथ्या वर्षी मराठवाडा श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मराठवाड्यातील अंदाजे दोनशे शरीर सौष्ठव पटुंनी सहभाग नोंदविला होता. अंतीम लढतीत सरस ठरलेल्या 75 किलो वजन गटात विजेता मुजिब शाह ‘मराठवाडा श्री’ चा हक्कदार ठरला संयोजकांतर्फे 11 हजार रुपये रोख व प्रमाणपत्रदेवून मुजिबशाहला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कै. शंकरराव चव्हाण सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या ‘मराठवाडा श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेत औरंगाबादच्या मुजिबशाहने ‘मराठवाडा श्री’चा बहुमान पटकाविला. सौरभ बेलेकर व बुटासिंगला उत्कृष्ट शरीरसौष्टवपटूचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन सुरेशदादा गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करताना सुरेशदादा म्हणाले की, व्यसनमुक्त व आरोग्यदायी तरुण पिढी निर्माण करण्याचे काम साहेबराव या स्पर्धेच्या माध्यमातून करत असून ते कौतुकास्पद आहे. यावेळी रनदीप, शेख फारुख भाई दिलीपसिंघ सोढी, चंद्रकांत भैरट, जयपाल रेड्डी, पंकज देशमुख, गिरीष नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक साहेबराव सोनकांबळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्याम सावंत यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून राजू भैय्या परदेशी, रमेश भोसले, प्राचार्य इम्तीयाज खान, संदीप पाटील मगर, जावेद अन्सारी, जाकेर खान यांनी कार्य केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेः 60 किलो वजन गट- प्रथम सौरभ बेलेकर, द्वितीय प्रदीप सरगम, तृतीय महमद अयाज तर चतुर्थ दुर्गाप्रसाद. 65 किलो वजन गटः प्रथम बुटासिंग द्वितीय अक्षय भारद्वाज, तृत्यी महमद रऊफ, चतुर्थ सन्मान सावंत. 70 किलो वजन गटः प्रथम महमद जैद, द्वितीय सना पारची, तृतीय अब्दुल रहेमान, चौथा सागर श्यामसुंदर, 71 किलो खुला गटः प्रथम मुजिब शाह, द्वितीय वैभव करकंटे, तृतीय शेख इमरान.

Related Photos