Breaking news

बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत सुबोध वाठोरे राज्यात तिसरा

हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेणारा सुबोध सुभाष वाठोरे या विद्यार्थ्याने शालेय बुडो मार्शल आर्ट पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्वल केली आहे. त्याचं यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

मागील महिन्यात नांदेड येथील गुरुगोविंदसिद्घ स्टेडियमवर संपन्न झालेल्या शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत सहभागी होऊन ४१ ते ४५ वजन गटात सुबोध वाठोरे याने प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर उस्मानाबाद येथे झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. त्यानंतर ०३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील यश मिळावीत तिसरा क्रमांक पिकविला आहे. करते प्रशिक्षणाचे मार्गदर्शन हिमायतनगर येथील मुख्य प्रशिक्षक खंडू चव्हाण यांनी दिले आहे. सुबोध हा हिमायतनगर तालुक्यातील मौजे महादपूर निवासी आश्रम शाळेचे अधीक्षक वाठोरे सर यांचे चिरंजीव असून, त्याच्या तिहेरी यशाचे येथील पत्रकार परमेश्वर गोपतवाड, डॉ. मनोज राऊत, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, पांडुरंग गाडगे, साईनाथ धोबे, अनिल मादसवार, अशोक अनगुलवार, दिलीप शिंदे, सुभाष दारवंडे, साहेबराव नरवाडे, मारोती वाडेकर, आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Photos