अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सिद्धूने पटकावले कांस्यपदक

नांदेड(प्रतिनिधी)पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ भारतोलन स्पर्धेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परमज्योतसिंघ सिद्धूने पटकावले कांस्यपदक पटकाविले.

परमज्योतसिंघ सिद्धूने ९४ किलोग्रॅम वजनी गटात आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून विद्यापीठाला पदक मिळवून दिले. परमज्योतसिंघ सिद्धूला विठ्ठलसिंह परिहार यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंसोबत डॉ. बळीराम लाड संघव्यवस्थापक डॉ. रमेश कदम, डॉ. नितेश स्वामी यांचा समावेश होता.
विजयी खेळाडूचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र- कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि एन. सरोदे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱयांनी अभिनंदन केले.

Related Photos