Breaking news

शिवजयंती निमित्त खुल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन

नविन नांदेड(प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त टेनिस बॉलच्या खुल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन हडको उस्माननगर रोडवरील गुंडेगाव पाटीजवळ ठेवण्यात आले असून प्रथम पारितोषकासह 25555/- सह अनेक पारितोषिके ठेवण्यात आले असून या सामन्यात जास्तीत जास्त संघानी नांव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रथमच यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त टेनिस बॉलच्या खुले क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले असून पतंजली स्टोअर्सच्या वतीने संतोष वर्मा यांनी प्रथम पारितोषिक 25555/-, द्वितीय युवाशक्ती मित्र मंडळाच्या वतीने 11111/- तर सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंघ सोडी यांच्या वतीने 5555/- रु.तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले असून याशिवाय राहूल सुर्यवंशी मॅन ऑफ दि सिरिज 3100/-, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, किपर याशिवाय अन्य पारितोषिकही ठेवण्यात आले असून प्रत्येक सहभागी संघातील उत्कृष्ट खेळाडूस साई अमिलकंठवार यांच्यावतीन सन्मान चिन्ह देण्यात येणार असून या सामन्यात सहभागी होण्यासाठी प्रवेश फि 601/- रु.ठेवण्यात आले असून रविवार 26/02/2017 रोजी पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. या संघात सहभागी होण्यासाठी स्मार्ट मोबाईल शॉपी सिडको, मुक्ती मेन्स वेअर जी.प.जवळ नांदेड, साई फॅब्रीकेशन गुंडेगाव पाटी, रेड टेप बीके हॉल श्रीनगर येथे नांव नोंदणी करावी. असे आवाहन आयोजक मित्र प्रेम क्रिकेट क्लब व युवाशक्ती मित्र मंडळ, गुंडेगांव मित्र मंडळ व सिडको हडको मित्र मंडळाच्या वतीने व गजानन कळकेकर, शिवाजी हंबर्डे, संदिप नांदेडकर, बंटी गजभारे, जगदिश कांगठे, अजय गालेवाड, कैलाश हंबर्डे, अविनाश पिल्ले, गुणाजी भोकरे यांनी केले आहे.

Related Photos