स्वारातीम विद्यापीठाचा खो-खो संघ पश्चिम बंगालला रवाना

नांदेड(प्रतिनिधी)अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील विद्यासागर विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ आज सोमवार दि.२७ फेब्रुवारी रोजी रवाना झाला आहे.

संघात उमेश सातपुते, रमेश सावंत, अभिजित पाटील, प्रशांत शेळके, सुशांत गुरव, सागर शिवदावकर, राहुल शेळके, भगत भुंबे, सुरज शिंदे, अक्षय सोनटक्के, हर्षद हातनकर आणि बाळासाहेब पोकार्डे या खो-खो खेळाडूंचा समावेश आहे. संघव्यवस्थापक प्रा. कमलाकर कदम, मार्गदर्शक संतोष सावंत, प्रा. पवन पाटील संघासोबत रवाना झाले आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा खो-खो संघ मागील दोन वर्षाचा पश्चिम विभागीय आणि मागील वर्षाचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेचा विजेता संघ आहे. संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. दीपक पानसकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि एन. सरोदे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. नागेश कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱयांनी शुभेच्छा दिल्या.

Related Photos