Breaking news

विद्यापीठाचा संघ दक्षिण आशियाई युवक महोत्सवासाठी इंदौर येथे रवाना

नांदेड(प्रतिनिधी)१० वा दक्षिण आशियाई आंतर विद्यापीठ युवक महोत्सव दि. २८ फेब्रुवारी ते ०४ मार्च, २०१७ दरम्यान देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदौर, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आला आहे. सदरील युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होत आहे. शै . वर्ष २०१५-१६ मध्ये संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवात किरण प्रकाशराव देशमुख या विद्यार्थ्याने वक्तृत्व कलाप्रकारात व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्यामुळे त्याची दक्षिण आशियाई आंतर विद्यापीठ युवक महोत्सवासाठी निवड झाली आहे व या युवक महोत्सवासाठी तो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

संघासाठी मा. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, मा. कुलसचिव श्री. बी. बी. पाटील, बी. सी. यू. डी. डॉ. दिपक पानसकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. जी. बी. कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि सरोदे, रा.से.यो. समन्वयक प्रा. नागेश कांबळे व जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कदम यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, वक्तृत्व कलाप्रकाराचे मार्गदर्शक डॉ. संदिप काळे व संघव्यवस्थापक डॉ. शिवदत्त विभुते संघासोबत रवाना झाले आहेत.

Related Photos