राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर

मुंबई(प्रतिनिधी)राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील/जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतात.

जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा स्तरावर एक युवक, एक युवती तसेच नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. तर राज्यस्तर युवा पुरस्कारी क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवतीस तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. राज्य पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्तीस 50 हजार रुपये असे आहे. तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार 1 लाख रुपये असे आहे. राज्य युवा पुरस्कार सन 2014-15 आणि 2015-16 करिता क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने क्रीडा विभागाच्या आठ विभागातून (मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अमरावती) प्रत्येकी आठ युवक, आठ युवती आणि आठ संस्थाची निवड केली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201702271521167521 असा आहे.

राज्य युवा पुरस्कारार्थीं सन 2014-15 साठीची निवड यादी पुढीलप्रमाणे:
मुंबई विभाग : प्रतिम सुतार, रायगड, स्नेहल शिंदे, मुंबई शहर, प्रिझम सामाजिक विकास संस्था मुंबई उपनगर,
नाशिक विभाग : विनीत मालपुरे कळवण, पूनम घुगे नाशिक, वनवासी उत्कर्ष समिती नंदूरबार,
पुणे विभाग : प्रवीण निकम पुणे, नेहा भाटे पुणे, स्नेहालय संस्था अमहदनगर,
कोल्हापूर विभाग : लखन जाधव कोल्हापूर, श्वेता परुळेकर कोल्हापूर, नेहरू युवा मंडळ पांगरी सातारा.
औरंगाबाद विभाग : पठाण अझहर खान औरंगाबाद, काजल भुसारे औरंगाबाद, शाहू महाराज प्रतिष्ठान बीड,
लातूर विभाग : उमाकांत मिटकर उस्मानाबाद, सुरेखा गिरी लातूर, सोपानराव तादालपुरकर क्रीडा मंडळ नांदेड,
नागपूर विभाग : सारंग राघाटटे वर्धा , पल्लवी आमटे चंद्रपूर, इको.प्रो.बहु.संस्था चंद्रपूर,
अमरावती विभाग : विशाल राखोडे अमरावती, खुशबू चोपडे अकोला, दीपस्तंभ संस्था अमरावती.
राज्य युवा पुरस्कारार्थीं सन २०१५-१६ साठीची निवड पुढीलप्रमाणे
मुंबई विभाग : विनायक कोळी ठाणे, प्रणिता गोंधळी रायगड, पंचशील सेवा संघ मुंबई उपनगर,
नाशिक विभाग : मनोहर जगताप नाशिक, रुपाली माळी धुळे, भरारी बहुउद्देशीय संस्था जळगाव,
पुणे विभाग : चिंतामणी पवार सोलापूर, दीक्षा दिंडे पुणे, अनाथ प्रेम संस्था अहमदनगर,
कोल्हापूर विभाग : अजित पोवार कोल्हापूर, प्रियंका पाटील कोल्हापूर, जनकल्याण संस्था कोल्हापूर,
औरंगाबाद विभाग : स्वप्नील चंदणे औरंगाबाद, अश्विनी महिरे, औरंगाबाद, युवा प्रतिष्ठान हिंगोली,
लातूर विभाग : प्रवीण पाटील लातूर, कृष्णाई उळेकर उस्मानाबाद, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण सेवाभावी संस्था नांदेड,
नागपूर विभाग : राजेश तलमले भंडारा, अर्चना चुधरी गडचिरोली, आरोग्य प्रभोधनी गडचिरोली,
अमरावती विभाग : ऋषिकेश खिलारे अमरावती, शारदा सोनकर अकोला, स्वामी विवेकानंद बहु शैक्षणिक संस्था शिरपूर मालेगाव वाशीम.
राज्यातील युवांच्या समाज हिताचा कार्याला प्रेरणा मिळावी यासाठी राज्य शासनातर्फे सन 2013 पासून प्रतिवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

Related Photos