Breaking news

नांदेडचे पोलीस शंकर भारती ठरले महाराष्ट्र

पोलीस दलात सर्वोकृष्ट नेमबाज;जिंकले पाच पदक आणि ट्रॉफी
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)नांदेड जिल्हा पोलीस दलातील कवायत प्रशिक्षक शंकर भारती यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धेत अत्यंत कमी वेळात निष्णात नेमबाजी करून दोन सुवर्ण,एक रौप्य आणि दोन कास्य पदक जिंकून सर्वसाधारण ट्रॉपी जिंकली आहे.आज शंकर भारती हे अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेसाठी गुवाहटी आसाम येथे रवाना झाले आहेत.आज पर्यंत झालेल्या 17 नेमबाजी स्पर्धात नांदेड जिल्ह्याने असे भव्य यश मिळवण्याची पहिलीच वेळ आहे.

दिनांक 28 फेब्रुवारी 2017 ते 2 मार्च २०१७ दरम्यान दौंड जिल्हा पुणेच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 येथे पार पडल्या.त्यात नांदेड जिल्ह्याचे 5 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.त्यात नांदेड पोलीस मुख्यालयातील कवायत प्रशिक्षक शंकर बालाजी भारतीं (ब.न. 3191) यांनी पिस्टल (बंदूक) या हत्याराने नेमबाजी करतांना स्कोटिंग पोजीशन मध्ये 5 सेकंदात 6 राउंड (गोळ्या) टार्गेट वर मारले आणि सुवर्ण पदक प्राप्त केले.दुसऱ्या प्राकृत 50 मीटर वरून 30 मीटर पर्यंत धावत येऊन अटॅक फायर पोजीशन मध्ये 12 सेकंदात 6 राउंड फायर करून रौप्य पदक प्राप्त केले.तिसऱ्या प्रकारात 50 गज स्नॅप शूटिंग फायर पोजीशन मध्ये 3 सेकंदात 1 राउंड अश्या वेळेत 6 फायर करून कास्य पदक प्राप्त केले.चौथ्या प्रकारात 25 गज लेफ्ट राईट हॅन्ड पोजीशन मध्ये 10 सेकंदात 6 राउंड फायर करून कास्य पदक प्राप्त केले.अश्या प्रकारे पिस्टल या बंदुकीने पाच पदक प्राप्त करून घेणाऱ्या शंकर भारती यांना ओव्हर ऑल पिस्टल सर्वोकृष्ट नेमबाज म्हणून सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केल्याने त्यांना समादेशक संजय शिंत्रे यांनी ट्रॉफी आणि सुवर्ण पदक प्रदान केले.

आज पर्यंत झालेल्या 17 नेमबाजी स्पर्धात नांदेडच्या पोलीस कर्मचाऱ्याने पहिल्यांदाच एवढे मोठे यश प्राप्त केले आहे.या यशाने शंकर भरती यांची निवड महाराष्ट्र पोलीस संघात झाली आहे.ते आज गुवाहटी आसाम येथे 17 व्या अखिल भारतीय रायफल,पिस्टल,कार्बाइन नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.या स्पर्धा दिनांक 10 मार्च 2017 ते 14 मार्च 2017 दरम्यान होणार आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवप्रसाद,पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे,aभोकरचे अपर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, सहायक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,पोलीस उप अधीक्षक अशोक बनकर,गृह पोलीस उप अधीक्षक विश्वेश्वर नांदेडकर,राखीव पोलीस निरीक्षक अरमान तडवी,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे,पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड,सुनील निकाळजे,राजू तासीलदार,सुभाष राठोड,गजानन सैदाने,सहायक पोलीस निरीक्षक विठ्ल पाटील,शरद मरे,विनोद दिघोरे,पोलीस उप निरीक्षक श्रीकांत भराटे,नाना लिंगे,बालासाहेब तोडकर,बंडू थेरे,भाऊसाहेब खंदारे, राखीव पोलीस उप निरीक्षक श्यामराव राठोड,शिवाजी पाटील,मुख्यालयातील सर्व कवायत प्रशिक्षक, पोलीस कर्मचारी भीमराव भद्रे, एकनाथ देवके, धोंडीराम केंद्रे, संगीता कापसे,सपना पाटील,शुभांगी कोरेगावे, शेख महेजबीन,बजरंग बोडके, देवानंद थडके, मंगेश जोंधळे,धनराज पुरी.किशन मूळे, मोहंमद अलीम,नामदेव शिरोळे,ऍड.दीपक शर्मा आणि नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शंकर भारतीचे अभिनंदन केले आहे आणि अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत यश मिळवण्यासाठी शुभकामना दिल्या आहेत.

Related Photos