राज्यस्तरीय स्केटींग चॅम्पियनशिपमध्ये मिताली व मयुरेश जहागिरदार यांचे यश

नवीन नांदेड(प्रतिनिधी)अक्कलकोट जि. सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्केटींग चॅम्पियनशिप स्पर्धेत मिताली मकरंद जहागिरदार व मयुरेश मकरंद जहागिरदार यांनी यश संपादन केले असून नुकत्याच एका समारंभात त्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले.

अक्कलकोट येथे दहावी राष्ट्रीय म्युझिकल चेअर आणि स्केटींग चॅम्पियनशिप नॅशनल सलेक्शन स्पर्धेचे आयोजन 25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. सिडको येथील रहिवासी तथा माणगाव जि. रायगड येथे कार्यरत असलेले मकरंद जहागिरदार यांची मुलगी व मुलगा मिताली व मयुरेश यांनी अनुक्रमे 30 ते 40 व 20 ते 30 गटातील स्केटींग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची पंजाब येथील राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Photos