कब्बडी स्पर्धेत पार्डीचा नवक्रांती क्रीडा संघ अव्वल

हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे प्रसिद्ध देवस्थान श्री परमेश्र्वर मंदिर यात्रा महोत्सवात आयोजित कब्बडी स्पर्धा दि.०५ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धा रात्री प्रकाशझोतातही सुरु होत्या. दरम्यान फायनल स्पर्धेत पार्डी येथील नवक्रांती क्रीडा संघाने विजय प्राप्त करून ११ हजार १११ रुपयाचे बक्षिस जिंकले आहे.

भारतीय खेळात प्रामुख्याने महत्व असलेल्या कब्बडी स्पर्धा महाशिवरात्र यात्रेत दि.०५ मार्च रोजी दुपारी सुरु करण्यात आल्या होत्या. तळपत्या उन्हात दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत हदगांव, हिमायतनगर, किनवट, गंगाखेड, तेलंगणा राज्यातील अनेक ठिकाणाहून एकुन १२ क्रीडा संघानी सहभाग नोंदवीला होता. अंधार पडू लागल्याने रात्री १०.३० वाजेपर्यंत प्रकाशझोतात कबबडीचे सामने संपन्न झाले. अंतिम सामना नवक्रांती क्रीडा संघ पार्डी व जयक्रांती क्रीडा संघ गंगाखेड यां दोघांच्या तुल्यबळ लढतीत झाला. या स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथील नवक्रांती क्रीडा संघाच्या युवकांनी गंगाखेडच्या क्रीडा संघास धूळ चारवीत प्रथम क्रमांकाची बाजी मारली. प्रथम क्रमांक घेऊन विजयी झालेल्या संघास 11111/- रुपयाचे बक्षीस यात्रा सब कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, क्रीडा व्यवस्थापन समिती व बजरंग दल युवकांच्या हस्ते देण्यात आले. दुसर्‍या क्रमांकाचे पारीतोषीक गंगाखेड येथील जयक्रांती क्रीडा संघास रुपये 7001/- रुपयाचे बक्षीस देण्यात आले. तिसरा क्रमांकाचे पारितोषीक रुपये 4001/- रामबापू संघ आमदरी यांना देण्यात आले. यावेळी कब्बडीचे पंच म्हणुन क्रीडा समीतीचे अध्यक्ष ऍड दिलीप राठोड, उपाध्यक्ष बाबुराव बोड्डेवार, सचिव के.बी.शन्नेवाड, सोनबा राऊत, बी.आर.पवार, पावडे सर, विठ्ठल पार्डीकर, चव्हाण सर, सोमवंशी सर, सागर सर, जाधव सर यांनी काम पहिले. गुनलेखक म्हणून शेख मोजमिल यांनी काम पहिले. यावेळी मंदिराचे संचालक अनंता देवकते, यात्रा कमिटीचे सचिव संजय माने, राम सूर्यवंशी, विपुल दंडेवाड, राम नरवाडे, प्रकाश साबळकर, सुभाष पाटील, बाबुराव भोयर, अशोक अनगुलवार, साईनाथ धोबे, अनिल भोरे, आदीसह क्रीडा प्रेमी नागरीक व खेळाडु हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.

Related Photos