logo

नांदेड, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजांचा कडकडाट होऊन उमरी तालुक्यातील मौजे कारला येथील आस्वल दरिचा माळ परिसरात वीज कोसळली. सदर वीज कोसळण्याची घटना येथील भुताळे यांच्या शेतात दि.१२ रोजी सायंकाळी ४:२० वाजता घडली असून, पेरणीपूर्व मशागतीच्या दरम्यान शेतातील धसकट व चीपाडे, कचरा वेचन्यास सादर महिला गेल्या होत्या. पाऊस सुरु झाल्याने झाडाखाली आसरा घेण्यासाठी थांबल्या असता वीज कोसळून पाच महीलांवर याचा प्रभाव झाला आहे. या आपत्कालीन घटनेत १) रेखा मारोती पवळे वय ३३, २) शोभा संभाजी भुताळे वय ४५, ३) शोभा देविदास जाधव वय ४०, ४) मोहनाबाई गंगाधर सोनवने वय ४८, ५) शेषाबाई माधव गंगावने वय ४५ या पाच जणींचा जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे कारला गावासह उमरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

जिल्ह्यात गत 24 तासात एकूण 64.26 मि.मी. पाऊस 
जिल्ह्यात सोमवार 12 जून 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकुण 64.26 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 4.02  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 70.36 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात 12 जून 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 0.13 (46.52), मुदखेड- 4.50 (56.95), अर्धापूर- 7.33 (66.32) , भोकर- 12.50  (111.25) , उमरी- निरंक (27.00), कंधार-2.00 (55.50), लोहा-2.00 (72.66), किनवट-3.86 (139.28), माहूर-0.50 (36.50), हदगाव-0.57 (218.32), हिमायतनगर-1.33 (63.49), देगलूर- निरंक  (43.47), बिलोली- 4.60 (32.60), धर्माबाद- निरंक (53.00), नायगाव-5.80  (34.00), मुखेड-19.14 (68.88) आज  अखेर  पावसाची सरासरी 70.36 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1125.74) मिलीमीटर आहे. 

    Tags