logo

नांदेड, उमरी तालुक्‍यातील मौ. कारला येथे दि.12 जून रोजी वीज पडून मृत्‍यूमुखी पडलेल्‍या ०५ महिलांच्‍या कुटुंबास आज दि.13 जून रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी भेट दिली. यावेळी तहसीलदार सुरेखा स्‍वामी, मंडळ अधिकारी ए. के. पवार व तलाठी सारिका विखे तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी भेटीमध्‍ये उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी पिडित कुटुंबांना प्रशासनाच्‍या वतीने तातडीने मदत करण्‍याबाबत तहसीलदार, उमरी यांना निर्देश दिले. तसेच ग्रामस्‍थांना यापुढे विजेपासून संरक्षण कशा प्रकारे करावे याबाबत सविस्‍तर मार्गदर्शन केले. विजांच्‍या कडकडाटाचे वेळी ग्रामस्‍थांनी आपले मोबाईल बंद ठेवावेत. तसेच इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. पावसाळ्याच्‍या दिवसामध्‍ये विजांच्‍या कडकडाटाचेवेळी झाडांखाली आश्रय घेणे टाळावे, तसेच जर ओसाड ठिकाण असेल तर जमीनीला टेकून बसा, असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी, डॉ. खल्‍लाळ यांनी केले. यावेळी कुटुंबियांचे नातेवाईक, गावकरी मोठ्या सांख्येने उपस्थित होते. 

काल झालेल्या घटनेनंतर कार्लयेथील पाचही मयत महिलांवर एकच चित्तेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


    Tags