logo

नांदेड, निसर्गाच्या अवकृपा, सततच्या नापीकीनी घराचा गाडा कसा चालवावा, बँकेचे कर्ज कसे फेडावे, बहीणींचे लग्न कसे होईल या विवंचनेत मौजे मंडाळा येथील एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या केली. या घटनेमुळे उमरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ऊमरी तालुक्यातील मौजे मंडाळा पोस्ट बितनाळ येथील लक्ष्मीकांत लक्ष्मणराव पुदलवाड वय २१ वर्ष हा युवक शेतकरी सततच्या नापीकी व कर्जबाजारीपणाने हैराण झाला होता. त्याच चिंतेला कंटाळुन दि.१९ रोजी सा़यंकाळी विषारी औषध प्रश्न केले. विषारी औषध प्राषण केल्याची बातमी शेजारील मित्रांना कळताच उमरी येथे प्रथमोपचार करुन, नांदेड येथील खाजगी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरु असतं दि.२० जूनच्या रात्रि ८ च्या दरम्यान  प्राणज्योत मावळली. दि.२१जुन रोजी मंडाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाचे वडील गेल्या दोन वर्षापुर्वी कर्क रोगाच्या आजाराने दगावल्यामुळे कुंटुबांची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. निसर्गाच्या अवकृपेने व सततच्या नापीकीनी घराचा गाडा कसा चालवावा, बँकेचे कर्ज, बहीणींचे लग्न आदी कारणामुळे काही दिवसापासुन तो बैचेन अवस्थेत होेता. लक्ष्मीकांत यास भैय्या या नावाने सर्वजण ओळखत होते. भैय्याची ओळख गावात होतकरु, प्रेमळ तरुण आणी मन्नेरवारलू समाजातील युवक कार्यकर्ते अशी होते. अशा प्रेमळ तरुण युवक आपल्यातुन गेल्याने अनेकांना अंत्यविधीच्या ठिकाणी अश्रु आवरता आले नाही. भैय्या गेल्याने संपूर्ण मंडाळा गावावर, तथा येथील मन्नेरवारलु समाजावर शोककळा पसरली आहे. याची दाखल घेऊन शासनाने शेतकरी युवकाचा कुटुंबियांना तातडीने मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी गावकऱ्यातून केली जात आहे. 

    Tags