logo

नांदेड, उमरी तालुक्यात वाळू माफीया चे राज चालत असुन अनेक वेळा वृतपतत्रा तुन वाळू माफीया विरोद्धात बातमी प्रकाशीत करण्यात आल्याने व तशी तक्रार तहसील कार्यालयात दाखल केली त्याच आकाश पोटी उमरी दै तरुन भारतचे प्रतिनिधी साहेबराव तुरेराव यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या बाबत अधिक माहीती अशी की,उमरी तालूक्यात सध्या वाळू धक्का उपसने बंदचे आदेश आहेत. पण या वाळूचे ठेकेदारानी ठिक ठिकाणी अवैध वाळूचे साठे करुन ठेवले, आणी बिनधास्त वाहतुक बेकायदेशिर सुरु आहे. याबदल् पत्रकार साहेबराव तुरेराव यांना कळताच अवैध वाहतुक महसुल प्रशासनाच्या निदर्शनास आनून देण्यासाठी तीन हायवा ज्यामध्ये साह ते सात ब्रॉस वाळू असलेले उभा होते. त्यांना रितसर रॉयल्टी पावती आहे काय ? विचारणा केली असता, त्यांच्याकडे दि. 2 जुलै 2017 च्या एका हायवा वाहनाकडे दोन, दोन असे पावत्या होत्या. मात्र तीच पावती दिवसभर चालवण्यात येत होते .पावती पेक्षा तीन ते चार ब्रास अवैध वाळूचा भरना होता. त्या अनूषगाने महसुल खात्यातील अधिकारी यांना पंचनामा करण्यास पत्रकार यांनी दुरध्वनीव्दारे विनंती केली होती. पण प्रशासनाचा एकही प्रतिनिधी न आल्याने पत्रकार यांनी रितसर तहसील कार्यालयात ३ जुलै रोजी अर्ज दिला. दि.4 जुलै रोजी 7: ३० वा. मो. 88 8 8 8० 75 6३ याद्वारे मी शारदा कंट्राक्शनचा मॅनेजर बोलतो. म्हणत तु तक्रार मागे घे नाही तर तुला व तुझ्या पारिवाराला जिवे मारतो म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तशी तक्रार पोलीस ठाणे येथे देण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक चंदकात गुंगेवाड यानी गुन्हा दाखल केला. या घटनेचा उमरी पत्रकार संघाकडून जाहीर निषेधदाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार बी व्ही चव्हाण, नंरेद्र येरावार, पी जी गीलचे, शेख हुसेनी , अब्दुल समद ,प्रल्हाद हिवराळे , साहेबराव तुरेराव, पाडूरंग सोनकांबळे , बापुराव रिठेकर, गणेश आनेमवाड, प्रशांत जोधंळे, राजेश खांडरे, आनंदा राठोड, फेरोज पटेल ,सत्यनारायण शेळके , नारायण यम्मेवार, आकाश सैदमवार आदीच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत .

    Tags