logo

नांदेड, नांदेड रेल्वे विभागाने 598 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांवर बसेसचा वापर करून कार्यवाही केली आहे. यासाठी नांदेड रेल्वे विभागाने दि.०८ रोजी अचानक विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची तपासणीची मोहीम चालविल्याने खळबळ उडाली आहे. 

दक्षिण मध्य रल्वे, नांदेड विभाग विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते.  या अंतर्गतच आज नांदेड विभागाने मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी केली. ज्यात श्रीमती नेहा रत्नाकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री प्रदीप कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक - एक, श्री अंजी नायक, सहायक वाणिज्य व्यवस्थापक-दोन या तीनही वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. हि मोहीम सकाळीच 4 वाजता सुरु करण्यात आली. यात नांदेड ते आदिलाबाद, औरंगाबाद, परळी अश्या विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्या मध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात बसेस, जीप चा वापर करण्यात आला. धावणाऱ्या रेल्वे मध्ये सेक्शन मध्ये अचानक धाड पडल्याने विना तिकीट प्रवाश्यांचे धाबे दणाणले. यात तब्बल 589 विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त समान घेवून जाण्यामुळे काही प्रवाश्यांवर कार्यवाही करण्यात आली. यातही काही  प्रवाश्यांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विना तिकीट प्रवाश्यांकडून एका दिवसातच एक लाख ऐकोन नव्वद हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आल्या. 

या कार्यवाहीत रेल्वे सुरक्षा अधिकारी, 33 तिकीट तपासनीस, 6 कार्यालयीन कर्मचारी, 5 वाणिज्य निरीक्षक, ३ ट्राफिक निरीक्षक, 8 रेल्वे पोलीस फोर्स चे जवान शामिल झाले. या तिकीट तपासणी मोहिमेत दिवसभरात धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. तसेच तपासणी दरम्यान असे लक्षात आले कि बरेच प्रवासी सीजन तिकीट घेवून आरक्षित डब्यांत बसले होते तसेच दुधवाले जनरल तिकीट घेवून प्रवास करत होते. त्यांना अशे कळविण्यात आले कि त्यांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नाही. त्यांनी एम.व्ही.एस.टी. तिकीट घेवूनच दुध घेवून प्रवास करावा. तसेच 20 विनापरवाना रेले गाड्या मध्ये खाद्य पदार्थ विकणाऱ्या वरही कार्यवाही करण्यात आली. हि तिकीट तपासणी विनातिकीट प्रवास करणाऱ्या मध्ये नैतिक भीती निर्माण करण्या करिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आली. या तिकीट तपासणी मुळे  कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. या कमी सहायक परिचालन अधिकारी, नांदेड यांनी खूप मदत केली. रेल्वे विभागातर्फे श्रीमती नेहा रत्नाकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, यांनी जनतेस आवाहन केले कि, प्रवाश्यांनी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा आणि होणार्या कार्यवाहीला टाळावे. गेल्या आठवड्यात कार्यवाही करूनही काही जन विनातिकीट प्रवास करत आहेत, आणि कार्यवाहीला सामोरे जात आहेत असेही त्या म्हणाल्या.

    Tags