logo

BREAKING NEWS

रेल्वे अपघातातील गुन्हेगार पोलिसांनी शोधला... लवकरच पकडणार.....

नांदेड, काल रात्री तिरूपतीकडे जाणाऱ्या साप्ताहिक रेल्वे क्र. 07067 समोर एक मोटारसायकल रेल्वेसमोर सोडून पळून जाणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे. काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अजून सापडलेला नाही. आता रेल्वेगाड्या या रूळांवर जाणाऱ्या गाड्यांचा वेग नियमीत होण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील.

काल रात्री नांदेड-तिरूपती जाणारी साप्ताहिक रेल्वे गाडी क्र. 07067 गाडी नांदेडहून निघाली. या गाडीला शिवणगाव रेल्वे स्टेशन पार केल्यानंतर एक छोटासा टेकडीवजा रस्ता आहे. मुळात ही लेवल क्रोसिंग नाही. त्याठिकाणी रेल्वे रूळांच्यामध्ये एक मोटारसायकल पडलेली रेल्वेचालकाने पाहिली. रेल्वे चालकाच्या तांत्रिक ज्ञानाप्रमाणे त्याने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला आणि सोबत ब्रेकही लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या बे्रकच्या पात्रतेप्रमाणे त्याने अर्जंट बे्रक लावला तर मोठी जिवीतहानी झाली असती. तरी पण गाडी मोटारसायकलला धडकली आणि जवळपास 20 फूटचा रेल्वे रूळ उखडून गेला आहे आणि इंजिनासह एक डब्बा खाली उतरला. सुदैवाने कोणतीच जिवीतहानी झाली नाही किंवा कोणाला ईजा पण झाली नाही. लेवल क्रोसिंग असेल तेथून रेल्वे रूळ पार करण्याचा अधिकार आहे पण असे सांगितले जाते की नांदेड डीआरएम कार्यालयाच्याअंतर्गत एकही रेल्वे लेवल क्रोसिंग नाही. कारण सर्वजागी पर्यायी रस्ते बनविण्यात आले आहेत, किंवा अंडरग्राऊंड रस्ते तयार आहे.

शिवणगावच्या रेल्वे रूळावर पडलेली मोटारसायकल क्र. एम.एच. 26 ए.पी. 7940 या क्रमांकाची आहे. रेल्वे धडकल्याने मोटारसायकल पूर्णपणे जळून गेली आहे. तसेच त्या आगीने रेल्वे इंजिनमध्ये सुद्धा काही ठिकाणी आग लावली. तेथे कोणतीच लाईट सोय नसल्याने प्रवाशांना भरपूर त्रास सहन करावा लागला. त्या अपघाताच्या मदतीसाठी पूर्णेहून मदत रेल्वे आली. अधिकारी, कर्मचारी आले, त्यानंतर प्रवाशांना थोडाफार मिळाला. अपघात ज्याठिकाणी आहे. त्या ठिकाणी इतर मार्गाने सुद्धा रेल्वे विभागाने बरीच मदत पोहचण्याचा प्रयत्न केला. पण लागणारा वेळ लागलाच आणि त्यामुळे प्रवाशांना नक्कीच त्रासाला सामोरे जावे लागले. रात्रीच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आज सकाळी दुसऱ्या इंजिनसह नांदेड-तिरूपती गाडी शिवणगाव येथून रवाना झाली.

शिवणगावचे सबस्टेशन मॅनेजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात माणसांनी रेल्वे रूळांवर मोटार सायकलसोडून पळून गेल्याची तक्रार दिली त्यानुसार रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलिस कायदा कलम 104 आणि 150 (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिसांनी आणि नांदेड जिल्ह्याच्या एटीसी पथकाने भरपूर प्रयत्न करून ही मोटारसायकल क्रमांक 7940 कोण चालवत होता याचा शोध घेतला. त्याचे नाव सुनील चांदोजी काळेवाड असे आहे. तो मूळ रा. वडेपूरी इथला आहे आणि त्याची सासरवाडी शिवणगाव येेथे आहे. त्या मोटारसायकलवर 3 लोक होतो की, 2 याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनीलचे वडील चांदोजी आणि बालाजी नावाचा एक माणुस पोलिसांनी बोलावून घेतला आहे. त्यांच्याकडे सुनीलबद्दल विचारपूस सुरू आहे.

काल रात्रीपासून बिघडलेली रेल्वे वाहतुक आज दुपारपासून नियमीत सुरू झाली आहे. उखडलेला 20 फुटांचा रेल्वेरूळ नवीन लावण्यात आला आहे. तरी पण या मार्गावरून नियमीत वेगाने जाणाऱ्या गाड्या सध्या धिम्या स्वरू ळपात जात आहे. रेल्वेची नियमीत गती प्राप्त होण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागतील असे रेल्वेसुत्रांनी सांगितले. एकूणच हा प्रकार घडल्यानंतर हा घातपाताचा प्रकार आहे काय अशी तपासणी सुद्धा पोलिस विभाग करीत होेते. परंतु सध्या प्राप्त माहितीनुसार बिना लेवल क्रोसिंगच्या रेल्वेरूळ पार करण्याच्या नादात मोटारसायकल चालकांनी रेल्वेरूळ पार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोटारसायकल बंद झाली आणि रेल्वेचा लाईट दिसताच आपल्या मृत्यूच्या भितीने त्यांनी मोटारसायकल सोडून पळ काढला. पण स्वत: पळत असताना आपण अनेक लोकांचा जीव धोक्यात घालत आहोत याचे भाण त्यांना राहिले नाही. रेल्वे विभागाने लवकरात लवकर प्रवाशांना काय मदत देता येईल यासाठी प्रयत्न केले. अनेक त्या खाजगी लोकांनी सुद्धा आपल्या परीने रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांची मदत केली, असे अनेकांनी सांगितले.

    Tags