Breaking news

लग्नानंतर फक्त 15 दिवस नांदवून विवाहितेचा छळ; युवतीचा विनयभंग

नांदेड(खास प्रतिनिधी)एका विवाहितेला लग्नानंतर फक्त 15 दिवस चांगले नांदवून भूखंड घेण्यासाठी 3 लाखाची मागणी करून त्रास देण्यात आला आहे. तसेच एका 20 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.

एका 28 वर्षीय विवाहितेने उमरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सन 2015 मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी मौजे धारजनी येथे ता.भोकर येथे तिच्या नवऱ्यासह तीन जणांनी तिला फक्त 15 दिवसच चांगले नांदवले. त्यानंतर निजामाबाद येथे भूखंड खरेदी करण्यासाठी तिने माहेरहून 3 लाख रूपये आणावेत म्हणून तिला नेहमी शारिरीक व मानसिक त्रास दिला.काही नातलंगांसोबत तडजोडीची बैठक झाली असतांना तिला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आला.उमरी पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार घुले अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत मौजे गौंडगांव येथे 21 वर्षीय युवती आपल्या घराजवळील हौदावर कपडे धुण्यासाठी गेली असतांना एका व्यक्तीने तिच्याजवळ येवून तिचा हात धरला आणि स्वत:च्या घरात येण्यासाठी सांगितले.तिने आरडाओरड केली असतांना या घटनेबाबत कुणास काही सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटूंबियांना जीवे मारतो अशी धमकी दिली.माळाकोळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार कदम अधिक तपास करीत आहेत.

Related Photos