Breaking news

मोबाईल घेण्यासाठी पैसे न देणाऱ्या पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

नांदेड(खास प्रतिनिधी)मौजे हातणी ता.उमरी येथे एका 27 वर्षीय महिलेला जीवंत जाळण्याचा प्रत्यन 29 ऑक्टोंबर 2016 रोजी भर दुपारी घडला आहे.

छायाबाई बालाजी निलेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोंबर 2016 रोजी दुपारी 12 वाजता तिचा नवरा हा तिला मोबाईल घेण्यासाठी 12 हजार रूपये मागत होता. छायाबाईने पैसे नसल्याचे सांगल्याने त्याने तिला काठीने मारहाण केली आणि त्यानंतर दुसऱ्या एकाने तिच्या अंगावर चिमणीतील रॉकेल टाकून तिचा नवरा बालाजी निलेवाडने काडीपेटीने तिला पेटवून देवून घरातून निघून गेला. उमरी पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक खान अधिक तपास करीत आहेत.

Related Photos