Breaking news

महिलेचा विनयभंग

नांदेड(खास प्रतिनिधी)अब्दुलापूरवाडी ता.उमरी येथे एका महिलेचा विनयभंगाचा प्रकार 10 नोव्हेंबर 2016 ला सकाळी 7 वाजता घडला आहे.

एक 37 वर्षीय महिला 10 नोव्हेंबर 2016 ला सकाळी 7 वाजता आपल्या घरासमोर असतांना एका व्यक्तीने येवून तुझा नवरा कुठे गेला आहे, अशी विचारणा केली.त्या महिलेने ते कामाला गेले आहे असे उत्तर दिले.त्या नराधमाने तिचा हात धरून बाथरूमध्ये ढकलले.तिने आरडाओरड केली असता शिवीगाळ करून तो पळून गेला.उमरी पोलिसांनी त्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हवालदार जागीरदार करीत आहेत.

Related Photos