धर्माबादचा वनरक्षक अडकला १६०० रुपयांच्या लाच सापळ्यात

नांदेड(खास प्रतिनिधी)लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही न करण्यासाठी १६०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या धर्माबाद येथील वनविभागाचे वनरक्षक संतोष जयदेव कसबे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जेरबंद केले आहे.

९ नोव्हेंबर २०१६ रोजी एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या कार्यालयात तक्रार दिली की, त्यांचे लाकडाचे वाहतुकीचे वाहनांवर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक कसबे यांनी १६०० रुपये लाचेची मागणी केली आहे.त्या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड युनिटतर्फे आज दिनांक १७ नोव्हेंबर २०१६ रोजी वनविभाग धर्माबाद येथील वनरक्षक निवासस्थान परिसरात लाच मागणी पडताळणी दरम्यान वनरक्षक कसबे यांनी पंचासमक्ष तक्रारदारास त्यांचे लाकडाचे वाहतुकीचे वाहनांवर कारवाई न करण्यासाठी १६०० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाल्याने आजच दिनांक १७ नोव्हेंबर २०१६ रोजी वनविभाग धर्माबाद येथील वनरक्षक निवासस्थान येथे लावण्यात आलेल्या सापळयामध्ये सापळा कार्यवाही दरम्यान वनरक्षक संतोष जयदेव कसबे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून १६०० रुपयांची लाचेची मागणी करून ती लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन संतोष जयदेव कसबे, वय ४० वर्ष, वनरक्षक (वर्ग-३), नेमणुक वनविभाग धर्माबाद यांचे विरुध्द पोलीस ठाणे धर्माबाद येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. सदरची यशस्वी सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधिक्षक एस.आर. चव्हाण व संजय कुलकर्णी, पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि.,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पी.एन.उलेेमाले, पो.नि. दयानंद सरवदे, पो.ना. शेख चॉंद, पो.ना. विनायक किर्तने, पो.कॉ. अमरजितसिंह चौधरी व चालक पोना शिवहार किडे यांनी केली आहे.

या बातमीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर रेकॉर्डींग असल्यास तसेच कोणीही लोकसेवक भ्रष्टाचार करीत असल्याचा एसएमएस,व्हीडीओ,ऑडिओ कोणाकडे असल्यास त्यांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी.शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केला असेल तर आणि शासकीय निधीचा गैरवापर केला असेल तर सुध्दा माहिती द्यावी.त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064,कार्यायालचा फोन क्रमांक 02462-253512 आणि पोलिस उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक 8554852999 यावर सुध्दा माहिती देता येईल.

Related Photos