सिंधी प्राथमिक आरोग्य केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांची भेट

उमरी(संजय मारावार)नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे हे ग्रामीण भागात दौरे करून विकास कामांचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत.

शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी उमरी तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दौरा केला. दरम्यान सिंधी प्राथमिक आरोग्य केंद्रास त्यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांच्‍या आजारांची विचारपुस करून अडचणी जाणून घेतल्या. वैद्यकिय अधिकारी डॉ.एन.एम.कस्तुरे यांनी आरोग्य केंद्रात चालणा-या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कक्षांची पाहणी करून रूण्णांशी संवाद साधला.

सिंधी परिसरातील विविध गावातील नागरीक या आरोग्य केंद्रात औषधोपचार घेत असतात. येथे दररोज सुमारे शंभर ते दिडशे अंतर बाह्य रूग्णांची तपासणी केली जाते अशी माहिती डॉ.कस्तुरे यांनी दिली. यावेळी जिल्‍हा पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एल. रामोड, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कोंडेकर, महिला व बालकल्‍याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रविणकुमार घुले, पशु संवर्धन अधिकारी पवार आदींची उपस्थिती होती.

Related Photos