धर्माबादच्या रूक्मीणनगरातील घर फोडून ३ लाख ५२ हजारांची चोरी

नांदेड(खास प्रतिनिधी)धर्माबाद येथील रूक्मीणनगरातील घर फोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

राजेश्वर सायलू बोलचेटवार हे तेलंगणातील राजराजेश्वर देवदर्शनासाठी घरातील सर्व मंडळींना घेऊन गेले होते. घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील नगदी दीड लाख, 7 तोळे सोने 60 तोळे चांदी असा एकूण 3 लाख 52 हजार 750 रूपयांचा ऐवज लंपास केला. कुलूप फोडल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बोलचेटवार यांना माहिती दिली. बोलचेटवार यांनी पोलिसांना चोरी झाल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केले तसेच श्वान पथकास पाचारण केले.

Related Photos