मौ. बोळसा (बु) आणि मौजे आडगावाट पावणे दोन लाखांच्या चोऱ्या

नांदेड (खास प्रतिनिधी) मौ. बोळसा (बु) ता.उमरी आणि मौजे आडगाव ता.लोहा अश्या दोन ठिकाणी चोरटयांनी १ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावात चोऱ्यांची दहशत निर्माण झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मौ. बोळसा (बु) ता.उमरी येथील पांडुरंग गोविंद डिडवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ते आपली दुकान बंद करून घरी गेले.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ते आपली दुकान उघडण्यासाठी आले असतांना दुकानाचे टिनपत्रे कापून कोणीतरी चोरटयांनी आतील २० हजार रुपयांचा किराणा माल ५०० रुपये किमतीचे मोबाईल रिचार्ज आणि १७ हजार ९०० रुपये रोख रक्कम चोरून नेली होती.उमरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार पठाण हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मौजे आडगाव ता.लोहा येथील मारोती इंद्रजित क्षिरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २३ नोव्हेंबरच्या रात्री १ ते पहाटे ५ वाजे दरम्यान ते घरास कुलूप लावून झोपी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन कपाटातील सोन्याचांदीचे दागीने ज्यांची किंमत १ लाख ३७ हजार रुपये आहे.ते चोरून नेले आहेत.लोहा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस उप निरीक्षक कोथवटे हे करीत आहेत.

Related Photos