जारिकोटच्या प्रियदर्शिनी वाचनालयात आज सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित

नांदेड(प्रतिनिधी)जारिकोट ता. धर्माबाद जि. नांदेड येथील प्रियदर्शिनी सार्वजनिक वाचनालयात शुक्रवार दि. १३ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रमाता सावित्रीआई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आणि सायन्ना ईसलवार स्मृतिदिनानिमित्त सर्व विद्यार्थी आणि खुल्या गटांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वाचनालय परिसर जारीकोट येथे सकाळी १० वाजता सामान्य ज्ञान स्पर्धा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना येत्या प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमातून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. प्रियदर्शिनी सार्वजनिक वाचनालयाच्या सचिव सौ. कलावती शिवाजीराव ईसलवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Related Photos