Breaking news

5 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवलदारासह खाजगी माणूस गजाआड

नांदेड(खास प्रतिनिधी)हुंडाबळी प्रकरणातील जामीनपात्र आणि अटक न करण्याच्या सूचना असलेल्या गुन्ह्यात अटक करू नये या साठी खाजगी इसमाच्यावतीने 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उमरीच्या पोलीस हवालदार आणि खाजगी माणसास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.

नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात 9 जानेवारी 2017 रोजी एका व्यक्तीने तक्रार दिली की,उमरी पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध गुन्हा क्रमांक १२०/२०१६ भादंविच्या कलम ४९८ (अ) ३२३,५०४,५०६ आणि ३४ नुसार दाखल झाला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार उद्धव गोविंदराव घुले (ब.न.६३२) यांच्या कडे आहे.या गुन्ह्यात त्यांना अटक न करण्यासाठी घुले हे ५ हजार लाचेची मागणी करीत आहेत.१६ जानेवारी २०१७ रोजी पोलीस हवालदार उद्धव गोविंदराव घुले रा.पोलीस कॉलोनी स्नेहनगर नांदेड यांनी बेंद्री ता.भोकर येथे ५ हजार लाचेची पैसे स्वीकारले.हे पैसे घुले यांनी खाजगी माणूस अशोक भगवान चव्हाण (२५) रा.बल्लाळ ता.भोकर याचे मार्फतीने घेतले.लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले आहे. वृत्तलिहीपर्यंत उमरी पोलीस ठाण्यात त्या दोघां लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. हि सापळा कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर,अपर पोलीस अधीक्षक एस.आर.चव्हाण, पोलीस उप अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे,गणेश सोंडारे,पोलीस कर्मचारी नामदेव सोनकांबळे, घोडसूरकर, विलास राठोड,सुरेश पांचाळ,वत्ते,अनिल कदम यांनी पार पाडली.

Related Photos